रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर ( प्रतिनिधी ) – अमळनेरची मुलुख मैदान तोफ विधानसभेत अमळनेरचे ३ वेळा प्रतीनिधित्व ज्यांनी केले शत्रूलाही शरण आल्यावर मरणदारातून परत आणणारे, अनेकांकडे आवडीने खायला जाणारे व आपल्याक डे त्यांना आदराने खाऊ घालणारे खवैय्या गुलाब बापू आपल्या अचानक कृतीने राजकारणात खळबळ उडवणारे माजी आमदार साथी गुलाबराव पाटील आज आपल्यात नाहीत.मा.आ. “साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह या कार्यक्रमाचे आयोजन करीत राहील. १ दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी साने गुरुजी विद्या लयाच्या प्राथमिक विभागाच्या नूतन इमारतीचा मिपूजन सोहळा (लोकसहभाग) २. १). सामाजिक पुरस्कार २) राजकीय (पुरोगामी) पुरस्कार वितरण करणार आहोत. स्वरूप – २१०००/- रोख स्मृती चिन्ह (शिंगाडेधारी गुलाबराव) लाल टोपी, रुमाल (बागायतदार) ३ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा (महाविद्यालयी न विद्यार्थी विषय: १. आंदोलने शेतकऱ्यांची, परीक्षा सरकारची…. २. समाजवाद – काल, आज, उद्या….. ३. बोल की लब, आजाद है तेरे! ४. भारतीय संविधान आणि लोकशाहीचे भवितव्य….. ५. खरा तो एकची धर्म….. स्वरूप:-प्रथम ११०००/-, द्वितीय ९ ०००/-, तृतीय ७०००/-, उत्तेजनार्थ (२) प्रत्येकी २०००/-विजेत्यांना आकर्षक स्मृती चिन्ह देण्यात येईल. वरील उपक्रमांसाठी तीनही प्रकारच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. १. सामाजिक पुरस्कार निवड समिती २. राजकीय (पुरोगामी) निवड समिती ३. साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह आयोजन समिती सोबतच या समारोहाच्या यशस्वीतेसाठी अनेक समित् या गठीत करण्यात आल्या आहेत. कृपया या कार्यक्रमाच्या विचार पेरणीला साठी समाजातील विविध घटक उपस्थित राहावेत या कामी प्रचार व प्रसाराचे कार्य आपल्या दैनिकातून वो, हि रास्त अपेक्षा कारण या कार्यक्रमात वक्ते जी मांडणी करतील समाजहिताची, तरुणांना योग्य दिशेची, शेतकऱ्यांना आस भविष्याची, महिलांना खात्री सुरक्षिततेची, आणि एकूणच देशातील जनतेला प्रेरणा मिळेल संविधान बचावाची. आपला नम्र .——
संदीप घोरपडे – सचिव, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ, अमळनेर जि. जळगाव