प्र.डांगरी येथे चाळीस वर्षानंतर वर्ग मित्र-मैत्रिणींचा स्नेह मेळावा

रयतसंदेश न्युज अमळनेर :–

प्र.डांगरी ता.अमळनेर येथील सन १९८४ मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग मित्र-मैत्रिणींचा स्नेह मेळावा तब्बल चाळीस वर्षानंतर एकत्र येत नुकताच संपन्न झाला.
सध्या उन्हाळ्यातील जास्त तापमान असतानाही लांबून इतर ठिकाणावरून सर्व वर्ग मित्र-मैत्रिणी आनंदाने डांगरी येथे स्नेहसंमेलनासाठी आले होते. बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, मनमोकळ्या गप्पागोष्टी करत सर्वांचा उत्साह द्विगुणीत झालेला होता.
सेवानिवृत्त शिक्षक श्री बी एस चौतमल सर, श्री जाधव सर, श्री श्यामकांत पंढरीनाथ शिसोदे सर यांचा या माजी विद्यार्थ्यांनी आदरपूर्वक सत्कार केला. त्यानंतर या शिक्षक वृंदांचे मार्गदर्शनपर मनोगते झालीत.
नंदकिशोर सोपान, सुधाकर बोरसे, नारायण पाटील, भागवत बोरसे, संजय बोरसे, राजश्री कोल्हे, सुनंदा सिसोदे, ज्योती मोरे, अशा बडगुजर, इंदिरा शिसोदे, सुरेखा बडगुजर, अवंता बडगुजर यासह इतरही मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.
स्नेह मेळावा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर बोरसे सर, अविनाश वाडीले सर, नंदकिशोर पवार सर, नंदलाल सैंदाणे, राजेंद्र ठाकूर सर, निलेश शिसोदे सर, सुभाष पवार, हिलाल कोळी, शांताराम न्हावी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या सांगतावेळी एकमेकांचा निरोप घेताना सर्वांचे अंतकरण जड झालेले होते.

You cannot copy content of this page