जी. एस. हायस्कूल चा ९८.८७ टक्के निकाल

अमळनेर रयतसंदेश न्युज  :-

येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल चा ९८.८७ टक्के निकाल लागला असून ३५६ पैकी ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १५६ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह तर ७२ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.शाळेतून ९० % च्या वर एकूण २७ विद्यार्थी आले आहेत.

प्रथम- भामरे प्रथमेश अजय (९५.८०%),
द्वितीय-पाटील आदित्य किरण (९५.२० %)
तृतीय- महाजन ऋषिकेश गोपाल (९४.४०%),ठाकूर प्रसाद अजित (९४.४०%)
चतुर्थ-पुरकर अर्चित शामकांत (९४.२० %) गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेचे चेअरमन हरी भीका वाणी,मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक ए.डी.भदाणे,एस.आर.शिंगाने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page