गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील आणि दत्त गुरु इंग्लिश मेडियम स्कूल, जवखेडा चे योगेश पाटील यांनी आर.टि.ई.अनुदान अपहार वरुन केले आरोप प्रत्यारोप

रयतसंदेश न्युज :-अमळनेर प्रतिनिधी.

 येथील गटशिक्षणाधिकारी, रावसाहेब मांगो पाटील यांच्याविरुद्ध मंगळवारी तालुक्यातील जवखेडे येथील दत्तगुरु इंग्लिश मीडियम स्कूलचे लिपिक उमेश राजेंद्र पाटील यांनी टक्केवारी मागण्यावरुन  गुन्हा दाखल केल्यानंतर रावसाहेब पाटील यांनी काल गुरुवारी सायंकाळी शिक्षण विभागात पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी पत्रकार बांधवांना माहिती दिली की सदर संस्था चालकांनी आर. टी.ई. अंतर्गत विद्यार्थ्यी प्रवेशाचे जास्तीचे अनुदान  घेतले.  31 मे 2024 पर्यंत संस्थेने 87 लाख 23 हजार 904 रुपये. अपहार केल्याचा उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे असे नमूद केले तसेच संस्था चालकांनी शासनाची मोठी फसवणूक केली असून त्यांचे भाऊ वकील असल्याने अधिकारी वर्गास दबाव तंत्रात आणून त्यांनी अनुदान लाटले गेले असे सांगितले. पुढे नमूद करताना म्हणाले की आपण वरिष्ठांकडे याबाबत अहवाल पाठवला असून त्यानुसार लवकरच चौकशी लागेल अशी मला खात्री वाटते आणि अपहार उघडकीस आल्यास उच्च न्यायालयात वसुलीसाठी दावा करणार आणि शासनाचे जादाचे लाटलेले अनुदान परत घेणार असे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी नमूद केले.

                    दत्तगुरु इंग्लिश मीडियम जवखेडा स्कूलचे ऍड.योगेश पाटील, भटूपाटील यांनी घेतली पत्रकार परिषद आर.टी.ई. अंतर्गत  संस्थेने नियमानुसार हक्काची रक्कम घेतली असून आम्ही कोणत्याही अपहारप केला नाही. याची कोणीही कोणत्याही प्रकारे खुशाल चौकशी करावी आम्ही दोषी आढळल्यास शासनास संपूर्ण रक्कम भरण्यास तयार आहोत असे नमूद केले. उलट गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी सदर अनुदान मंजूर करून आणण्यासाठी पाच टक्के लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केला संस्थेच्या वतीने अधिक खुलासा करण्यासाठी काल संध्याकाळी टाऊन हॉल,अमळनेर येथे दत्तगुरु इंग्लिश मीडियम स्कूल चेअँड. योगेश पाटील भटू पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी सांगितले की गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी आमच्याकडे रक्कम मंजूर करून देतो पाच टक्क्याची रक्कम मला द्या असे सांगितले त्यामुळे आम्ही त्यांना देण्यास नकार दिला आणि त्यांनी संस्थेचे बदनामी सुरू केली अशा जर काही खोटे आढळल्यास आम्ही त्यांच्या वर अब्रू नुकसानीचा दावा  दाखल करणार असल्याचे नमूद केले. आमच्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुले शिकण्यासाठी येतात शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क असून शासनाच्या योजना अंतर्गत आम्ही अनुदान घेतो त्यामुळे आम्ही कुठलेही चूक केली नसून जर केले असेल तर शासनाचा पैसा एक रकमी देऊ त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page