“मणिपूर घटनेचा निषेध मोर्चा”

“महाविकास आघाडी अमळनेर तर्फे मणिपूर घटनेचा निषेध मोर्चा”.
अमळनेर ता. प्रतिनिधी:- बापूराव ठाकरे .

दि.26 जुलै,बुधवार रोजी शासकीय विश्रामगृह ते प्रांताधिकारी कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. मणिपूर येथील पीडित महिलांना न्याय मिळावा. केंद्र सरकारचा निषेध करत प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देण्यात आले .यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील. शहराध्यक्ष श्याम पाटील. काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे. शिवसेना ठाकरे गट तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई वाघ ,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुरेश पिरन पाटील .कृ.बा.स.संचालक प्रा.सुभाष पाटील, ग्रंथालय विभागाचे उमेश पाटील. नगरसेवक प्रताप शिंपी. नरेंद्र संदांनशिव ,संदीप घोरपडे सर,मुन्ना शर्मा ,मराठा समाज अध्यक्ष जयवंतराव पाटील,धनगरआण्णा पाटील, के.डी. बापू ,विजय पाटील संभाजी पाटील, सचिन वाघ, गजेंद्र साळुंखे , मनीषा परब, उज्वला कदम, कल्पना वानखेडे,मयूर पाटील सर. अँड.रज्जाक शेख, गोविंद सोनवणे, संजय चव्हाण, योगेश शिसोदे, कुणाल चौधरी ,पी .वाय. पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page