अमळनेर प्रतिनिधी:- बापूराव ठाकरे. वात्सल्य सिंधू कुटुंब वत्सल,आक्कासाहेब गं.भा. प्रमिलाबाई सुभाषराव सोनवणे. पाटील वाडा, शिरपूर जि. धुळे ह्या नुकत्याच ८ जुलै रोजी अनंतात लिंन झाल्या आक्का साहेब यांचा जन्म 1951 या वर्षी आदर्श गांव म्हळसर ता. शिंदखेडा. जि. धुळे येथे झाला आक्का साहेबांचे बालपण म्हळसर या गावी गेलं त्यांनी तेथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलं त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण सातवीपर्यंत मुळावद या गावी घेतलं. एक आदर्श शेतकरी कुटुंब कै.सिताराम धनजी शिंदे आणि कै.लक्ष्मीबाई सिताराम शिंदे समाजातील आदर्श कुटुंब त्या कुटुंबात आक्कांना पाच भाऊ होते त्यापैकी भीमराव सिताराम शिंदे बी.एस.एन.एल मध्ये इंजिनिअर म्हणून नोकरीला होते ते सेवानिवृत्त होऊन दोंडाईचा इथे वास्तव्य करतात दुसरे भाऊ कै. रंगराव सिताराम शिंदे सेवानिवृत्त पी.एस.आय हे शिरपूर येथे वास्तव्य करत होते पुढे शेतीचा वारसा चालवण्यासाठी श्री.जाधवराव सिताराम शिंदे आदर्श शेतकरी म्हणून म्हळसर येथे राहतात चौथे भाऊ प्रल्हाद सिताराम शिंदे हे त्यांच्या शेजारी पाटील वाडा मध्येच राहतात सेवानिवृत्त एस आर पी आहेत.लहान धृवराज सिताराम शिंदे हे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले ते धुळे ते वास्तव्य करतात .आक्कांची प्रिय बहिण सौ. मालतीबाई चंद्रशेखर पवार पातोंडेकर यादेखील शिरपूर येथे वास्तव्य करतात. म्हळसर येथील कुटुंब तसं समाजासाठी आदर्श सर्व भाऊ बहिणी इतक्या उतार वयात सुद्धा गुण्या गोविंदाने भेटीगाठी घेतात .सुखदुःखात सहभागी होतात .आक्कांच्या सासरचा परिवार म्हटला म्हणजे कै.शिवराम सोनवणे यांच्या त्या सुनबाई आणि कै. सुभाषराव शिवराम सोनवणे यांच्या धर्मपत्नी आपल्या सासरी फार काबाडकष्ट करून संसार उभा केला, वेळोवेळी त्यांनी परिवाराला यथोचित साथ दिली.ज्याप्रमाणे म्हळसर येथील कुटुंब मोठं, सुसंस्कृत, सुशील होतं तसेच सासरी पाटील वाड्यात मोठे कुटुंब त्यामध्ये वासुदेव सोनवणे हे स्वातंत्र्य सैनिक होते ते 1971 च्या युद्धामध्ये शहीद झाले होते .त्यानंतर श्रीपतराव सोनवणे आदर्श शेतकरी. काशिनाथ सोनवणे हे सेवा निवृत्त स्वातंत्र्य सैनिक आहेत. ते चुंचाळे ता.चोपडा येथे आदर्श शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. आक्कांना तीन मुली आणि एक मुलगा मोठी मुलगी कानळदेकर गं.भा. प्रतिभा नामदेव चव्हाण.गृहिणी आहेत. दुसरी मुलगी तांदुळवाडीकर सौ.रत्नाबाई संभाजीराव सैंदाणे गृहिणी आहेत .सर्वात लहान लाडाकोळाची मंगरूळ ता.चोपडा येथील शिवमती पुनम बापूराव ठाकरे ह्या अमळनेर येथील जिजाऊ झेरॉक्स व शालेय स्टेशनरी च्या संचालिका आहेत आणि कुटुंबाला धरून ठेवणारे हक्कांचे लाडके सुपुत्र श्री. किशोर सुभाष सोनवणे उर्फ बबलू अण्णा माजी नगरसेवक शिरपूर नगरपालिका आणि त्यांच्या आदर्श सुनबाई सौ.संगिता किशोर पाटील हे दोघी जन नातेवाईक, परिवार, समाज, गोरगरिबांसाठी नेहमी कार्यतत्पर असतात.श्री किशोर पाटील एक आदर्श शेतकरी सुद्धा आहेत त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतलेले आहे. आक्कांचा मोठा नातू गौरव हा एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत आहे. लहान नातू तन्मय सोनवणे हा बारावीचे शिक्षण घेत आहे अशा या आदर्श गुणी कुटुंबाच्या आधारस्तंभ कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या अक्कासाहेब कुटुंबाला सोडून गेल्या त्यांना वैकुंठात उच्च स्थान मिळो त्यांच्या आठवणी नेहमीच आजरामर राहतील “दाटला कंठ माझा, गहिवरले शब्द लेखणीचे. ऋण तुझे अनेक आई शब्दात सामावले जग सारे. लाभू दे पुण्याई अशी सारे जन्म तुझ्याच उदरात मिळे”धन्य ती माता अशा या आदर्श मातेला शतशत नमन🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
आदर्श गुणी कुटुंबाच्या आधारस्तंभ अक्कासाहेब कुटुंबाला सोडून वैकुंठात गेल्या
