जि.प.प्राथमिक शाळा, पिंगळवाडे येथे बँक ऑफ बडोदा निंभोरा शाखेकडून लेखन साहित्य वाटप.
अमळनेर प्रतिनिधी:- बापूराव ठाकरे.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे या शाळेत बँक ऑफ बडोदा शाखा निंभोरा यांचेकडून बडोदा बँकेच्या ११६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने शाळेतील १०० विद्यार्थ्यांना कंपासपेटी, चित्रकला वही हे लेखन साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वंदना ठेंग होत्या. लेखन साहित्याचे वितरण बँक ऑफ बडोदा निंभोरा शाखेचे शाखा अधिकारी नितीन वसावे यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे कर्मचारी महेंद्र पाटील, मिल के चलो असोसिएशनचे विनायक पाटील, चेतन वैराळे आदी उपस्थित होते.
शाखाधिकारी नितीन वसावे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समजवतांना स्वत:चे अनुभव कथन करत पिंगळवाडे शाळेतील विद्यार्थ्यांनीही अशीच मेहनत व अभ्यास करुन मोठे अधिकारी व्हावे यासाठी शुभेच्छा देत वैयक्तिक तथा बँकेतर्फे वेळोवेळी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच शाळेतील सुंदर बगिचा, स्वच्छ व रम्य परिसर पाहून शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांचेही कौतुक केले. यावेळी इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड झालेल्या प्रदिप पारधी याचाही बँकेतर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक वंदना ठेंग,उपक्रम शिल, उपशिक्षक दत्तात्रय सोनवणे, प्रविण पाटील, रविंद्र पाटील, वंदना सोनवणे, बँक कर्मचारी आदित्य घोगरे, जयंत बिऱ्हाडे, महेंद्र पाटील, रविंद्र देशमुख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सोनवणे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रविण पाटील यांनी केले.बँक अधिकारी यांचे ग्रामस्थ, पालक वर्गातून कौतुक होत आहे.