स्व.श्री.एम.एस.मुंदडा माध्यमिक विद्यालयात विदयार्थ्यांनी घेतला निवडणुकीचा अनुभव
अमळनेर प्रतिनिधी:-
येथील श्री.एम.एस.मुंदडा माध्यमिक विद्यालयात नागरिकशास्त्र तसेच लोकशाही मूल्यांच्या आधारावर शालेय उपक्रमांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे .लोकशाहीत निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे .निवडणुक ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.याबाबत अनेक तरुण-तरुणी नागरिकांना माहिती नसते.
” मतदार राजा जागा हो. निवडणुकीचा धागा हो”त्यासाठीच इ.१० वीच्या इतिहास राज्यशास्त्र विषयात ” निवडणूक प्रक्रिया” हा पाठ देण्यात आला आहे .इ.१० वीचे विद्यार्थी हे भावी मतदार आहेत .त्यामुळे या पाठावर आधारित कृतीयुक्त निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी या उद्देशाने लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक घेऊन वर्गमंत्री,शालेय पोषण आहार मंत्री,स्वच्छता मंत्री,सहल मंत्री यांची निवड करण्यात आली.
कृतीयुक्त निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया पाठ समजणे अतिशय सोपे गेले.
या निवडणुकीच्या रिंगणात ७ उमेदवार होते.यात
भूमिका अहिरे -मुख्यमंत्री
देव पवार-शालेय पोषण आहार मंत्री,
तेजस्विनी महाजन-स्वच्छता मंत्री,
प्रिती कोळी-सहल मंत्री वरील उमेदवारांची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना दिलेले अनुक्रमांक तपासणे ,बोटाला शाही लावणे ,यासाठी मतदान केंद्राध्यक्ष ,अधिकारी व कर्मचारी म्हणून शाळेतील उपशिक्षक किशोर पाटील,राजेंद्र महाजन,धमेद्र साळुंखे यांनी भूमिका बजावली.मुख्याध्यापक धनराज महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.इतिहास व राज्यशास्त्र शिक्षक सुनिल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.