खा.शी. मंडळाच्या श्रीमती, द्रो.रा.कन्या शाळेचा वर्धापन दिन साजरा .
अमळनेर प्रतिनिधी:- बापूराव ठाकरे .
दि. 23 जुलै रोजी श्रीमती, द्रो.रा. कन्या शाळेच्या 79 वां वर्धापन दिन खेळीमेळीच्या वातावरणात, उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे द्वीप प्रज्वलन करून व शाळेचा लोगो असलेला प्रकाश कंदील आकाशात सोडण्यात आला. त्यानंतर वर्षभरात विशेष प्राविन्य मिळवणाऱ्या शिक्षक, विद्यार्थ्यांच्या सन्मान, सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात खा.शी.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे यांनी पुढील काळात कलेक्टर होइल त्या विद्यार्थ्यांला एक लाख रुपये बक्षीस मिळेल अशी घोषणा केली.या प्रसंगी खा.शी.मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, संचालक हरी आण्णा वाणी, मा.चेअरमन प्रदिप अग्रवाल,संचालक योगेश मुंदडा,उपाध्यक्ष माधुरी पाटील,विश्र्वस्त वसुंधरा लांडगे,जी.एस.माध्य.मुख्खाध्यापक.बी.एस..पाटील,चिटणीस प्रा.ए.बी.जैन, सहचिटणीस प्रा.डॉ. धिरज वैष्णव, प्रा.मुख्खा.कैलास पाटील. फार्मसी प्राचार्य प्रा.रवींद्र माळी,शिक्षक पालक संघाच्या प्रियंका पवार उपस्थित होते. कला व क्रीडा विभागाने सजावटीसाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या कर्तव्य दक्ष,शिस्त प्रिय. मुख्याध्यापिका एस.एस.सुर्यवंशी यांनी केले.मान्यवरांचा परिचय शिक्षिका एस.पी. बाविस्कर यांनी करुन दिला. सूत्रसंचालन श्रीमती.आर. एस .सोनवणे . आभार पर्यवेक्षक, विनोद मधूकर कदम ( बाळासाहेब) यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्येने पालक उपस्थित होते.शाळेच्या वर्धापन दिनास *रयतसंदेश* कडून मनपूर्वक शुभेच्छा💐