“जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप तर्फे अँड. ललिताताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 26 जुलै रोजी शेतकरी मार्गदर्शन मेळावा”.
अमळनेर प्रतिनिधी:- बापूराव ठाकरे.
प्रसिद्ध हवामान तज्ञ व अभ्यासक पंजाबराव डख साहेब शेतकऱ्यांना हवामान अंदाजानुसार शेती करता यावी यासाठी 26 जुलै रोजी सकाळी 11 वा.अंबिका मंगल कार्यालय, गलवाडे रोड, अमळनेर येथे मार्गदर्शन करणार आहेत .अमळनेर तालुका हा कमी पर्जन्यमान व सतत अवर्षणप्रवणग्रस्त क्षेत्रामध्ये मोडला जातो. त्यामुळे हवामानामध्ये अनियमित्ता आढळते त्या कारणामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान होते .उत्पन्न घेता येत नाही उत्पन्न आलं तर त्याला भाव मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज अचूक आला तर त्या पद्धतीने शेतकरी आपली शेतीची मशागत करू शकतात म्हणून सुप्रसिद्ध हवामान तज्ञ व अभ्यासक पंजाबराव डक साहेब शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी कार्यक्रमास तालुक्यातील परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हजेरी लावून आपल्या हितासाठी कार्यक्रमास हजर राहावे असे आवाहन जिजाऊ बहूउदे्शीय संस्था व फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.