नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल कु.गौरी पंकज गरुड हिचा मराठा सेवा संघ, जळगांव तर्फे सत्कार
अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.
नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अंडर 15 या वयोगटात राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धेत कु.गौरी पंकज गरुड हिने कांस्यपदक मिळवल्याबद्दल मराठा सेवा संघ, जळगांव तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दादासो. शिवश्री.राम पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, मा.जि.प.सदस्य शिवश्री.रविंद्र नाना पाटील, मराठा सेवा संघाचे महानगर उपाध्यक्ष – शिवश्री.संदीप पवार, सचिव – शिवश्री.चंद्रकांत देसले, शिवश्री.मधुकर पाटील, शिवश्री.विजय रमेश पाटील, शिवश्री. धिरज पाटील, शिवश्री.पंकज चव्हाण आदि उपस्थित होते.
कु.गौरी ही जि.प.शिक्षक – शिवश्री.पंकज गरुड सर आणि जि.प.शिक्षिका – श्रीमती.श्वेतांबरी पाटील मॅडम यांची सुकन्या आहे.कु.गौरी ला रयतसंदेश न्युज तर्फे मनपूर्वक शुभेच्छा, अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐