*मराठा सेवा संघ शाखा चाळीसगाव तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न*
अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.
आज दिनांक ३०/७/२०२३ रोजी शहरातील नानासाहेब य. ना.चव्हाण महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न झाला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून चाळीसगाव शहरातील पोलीस निरीक्षक संदीप पाटील साहेब हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री रमेश अण्णा निकम यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून माननीय आमदार मंगेश दादा चव्हाण माननीय खासदार उन्मेश दादा पाटील माननीय राम दादा पवार केंद्रीय कार्यकारणी सदस्य ,माननीय सुधीर आबा पाटील उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले प्रमोद बापू पाटील प्रा. डॉ.एस आर जाधव, जयश्रीताई रणदिवे, लतिकाताई देसले, काकासो प्रदीप देशमुख हे विचार मंचावर उपस्थित होते. यावेळी दीपक पाटील (नगरसेवक), मिलिंद देशमुख, सुनील बापू देशमुख, कपिल पाटील, संजय भास्कर पाटील उपस्थित होते… मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तसेच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम उत्तम अशा एकजुटीने संपन्न केला….