अमळनेर प्रतिनिधी- जळगांव जिल्ह्यातील उत्तुंग कामगिरी करणाऱ्या युवकांचा दैनिक लोकमत आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमत Young’s achievers of Jalgaon_ 2024 हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील अनेक क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करून आपल्या कर्तुत्वाने नाव कमावणाऱ्या कर्तुत्व अशा तरुणांचा हा दैदिप्यमान सोहळाच होता. या कार्यक्रमात 24 सन्मार्थींचा गौरव करण्यात आला.
यात गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ.अनिकेत पाटील यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले डॉ.अनिकेत पाटील हे डी.वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सध्या एम.सी.एच न्युरो सर्जरीचे शिक्षण पूर्ण करत आहेत.डॉ.अनिकेत पाटील यांनी वडील माजी खासदार डॉ.उल्हासजी पाटील आणि प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.वर्षाजी पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत समाजसेवेचा वसा घेतला आहे.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हासजी पाटील साहेब, उद्योगातील एम.डी आयकॉन दिनेश राठी, विवोतेलु केझो(IAS Prob),आर्थिक सल्लागार राहुल पाटील आणि कार्यक्रमाच्या स्पेशल गेस्ट म्हणून सिने अभिनेत्री सुरभी हांडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
सहकारी औद्योगिक वसाहतीत पायाभूत सोयीसुविधासाठी शासनाकडून आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करू अमळनेरमधील महिलांचे काम कौतुकास्पद असून महिलांना मदतीचा हात देत महिलांसाठी महिला…