व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी यांनी राज्यस्तरीय शिखर अधिवेशनातील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवावा– रमाकांत पाटील

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर (प्रतिनिधी ) – शिर्डी येथे दिनांक 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर 2024 रोजी व्हाईस ऑफ मीडियातर्फे पत्रकारांसाठी राज्यस्तरीय शिखर अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. पत्रकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी सदर अधिवेशनात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी यांनी राज्यस्तरीय शिखर अधिवेशनातील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. या सांस्कृतिक कार्यक्रमात गीत गायन कराओके, नृत्य, एकपात्री प्रयोग, नाटीका, मिमिक्री, विडंबन काव्य, संगीत वादन असे विविध कलागुण सादर करण्याची संधी पत्रकारांना मिळणार आहे. व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संदीपजी काळे, प्रदेशाध्यक्ष श्री.अनिलजी म्हस्के, प्रदेश कार्याध्यक्ष श्री.योगेंद्रजी दोरकर आदी वरिष्ठांच्या मान्यतेने राज्य शिखर अधिवेशनात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी व पत्रकारांनी येत्या दि.10 ऑगस्ट 2024 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्यातील कलागुण सादर करण्यासाठी आपले संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, संपूर्ण पत्ता याप्रमाणे आपली नावे द्यावी.. 10 ऑगस्ट 2024 नंतर आलेल्या नावांना प्राधान्य दिले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी केलेली नसल्यास कार्यक्रमात ऐनवेळी कोणालाही कलागुण सादर करण्याची संधी मिळणार नाही. म्हणून गीत गायन कराओके, नृत्य, एकपात्री प्रयोग, मिमिक्री, विडंबन काव्य, संगीत वादन असे विविध कला गुण सादर करण्याकरिता अगोदरच आपली नावे 9922438398 या क्रमांकावर द्यावीत, असे आवाहन रमाकांत पाटील .*अध्यक्ष, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन समिती राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी
जिल्हाध्यक्ष, व्हाईस ऑफ मीडिया नंदुरबार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page