अमळनेर (प्रतिनिधी )- दहिवद ता.अमळनेर येथील रहिवासी माजी आमदार खानदेशची मुलुख मैदान तोफ एक वर्षांपूर्वी थंडावली खानदेशात एक काळ गुलाबराव पाटील यांच्या जनजागृती, राजकारणी, समाजकारणाचा होता समाजवादी विचारांच्या गुलाबरावांवर साने गुरुजींचा विचारांचा पगडा होता. ते राष्ट्रसेवा दलाचे शिपाई होते. हे १९७८ च्या पुलोद काळात अमळनेर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते .नंतर तीन वेळेस एकूण तेरा वर्षे असे जनता दलाचे आमदार होते हा संपूर्ण काळ त्यांनी अक्षरशः गाजवला *मायबोली अहिराणी तूनचं शपथ घेईन* अशा घोषणा करून त्यांनी त्यावेळी विधानसभा गाजवली होती शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्या अभ्यास दांडगा होता .तेवढ्याच आक्रमकतेने ते शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्नांचा अभ्यास करत. तेवढ्याच आक्रमक शेतकऱ्यांचे कष्टकर्याचे प्रश्न सभागृहात आणि सभागृहा बाहेर मांडत असत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काढलेला शिंगाडे मोर्चा, सभागृहातून राजदंड पळवणे, अशा आंदोलनामुळे त्यावेळी गुलाबराव वामनराव पाटील यांनी विरोधक असूनही राज्याच्या राजकारणात स्वतःची वेगळी छापून ठेवली होती त्यांची जाहीर सभांमध्ये भाषणे म्हणजे त्याकडे स्रोत्यांसाठी परवणीच असे जाहीर सभेत मध्यांतर घेऊन पुन्हा सभा सुरू करायचे कसब आचार्य अत्रे नंतर गुलाबराव पाटील यांच्याकडेच होते. संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेले सभा रात्री दहा ते अकरा पर्यंत चालत असे त्यामुळे मध्यांतर करावे लागे. विशेष म्हणजे मध्यंतरानंतर गर्दी वाढलेले असायची. आणीबाणीच्या नंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या तुफान सभांमुळे जळगांव जिल्हा हादरुन सोडला होता .अहिराणी भाषेत विरोधकांच्याअक्षरशः चिंधड्या उडवत असत. असे असले तरी विरोधकात त्यांची सगळ्यांशी मैत्री होती. तेवढा मोकळेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता *भरा गाडी आणि चला वलवाडी* ही त्यांची घोषणा प्रचंड गाजली होती आणि त्या काळाची ती गरज पण होती. सोप्या ग्राम्य भाषेतील घाणाघाती भाषणे हे त्यांचे वैशिष्ट्ये होते.
आणीबाणी काळात त्यांची नाशिक तुरुंगात परवानगी झाली होती. त्यावेळी तेथील एकूण स्थान बद्ध ‘मीसाबंदी’ पैकी सर्वाधिक काळ पॅरोलवर गावी राहणारा माणूस म्हणजे माजी आमदार गुलाबराव पाटील होते. वागण्या- बोलण्यात असलेली निर्भीडता आणि बेधडकपणा त्यांच्या पत्रकारिकेत देखील होता *साथी संदेश* या त्यांच्या साप्तांहिकाचे अनेक विशेषांक गाजले. ग्राम्यम्हनींचा मुक्त वापर ते भाषणांमधून आणि *साथी संदेश* या साप्ताहिकातून करत. अत्यंत आक्रमक शीर्षके देण्यात त्यांचा हातखंडा होता. राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री के. एम. बापू पाटील हे देखील गुलाब बाबांच्या लेखणीच्या तळ्याख्या तुन सुटले नव्हते.
समाजामध्ये विचारांवर त्यांची एवढी अविचलनिष्ठा होती तिथी, मुहूर्त, वगैरे परंपरागत शिष्टाचारांना फाटा देत आपल्या जन्मदिनी त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सर्वांची विवाह केले. प्रज्ञा समाजवादी पक्षापासून सुरू झालेला गुलाबरावांचा राजकीय प्रवास संयुक्त समाजवादी नंतर जनता दलाचा झाला मात्र एका टप्प्यावरती काँग्रेसवासी झाल्याने त्यांच्या अनेक समर्थकांना धक्का बसला होता. त्यानंतर गुलाबराव चा राजकीय प्रवाह हळूहळू कमी होत गेला आणि त्यानंतर वयपरत्वे ते सक्रिय राजकारणातून बाहेर पळले. अर्थात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात ते शेवटपर्यंत कार्यरत होते त्यांच्या गाडीवर देखील *मुलुख मैदान* असलेले होते. अशा गुलाबराव पाटील यांच्या निधनाने एक तळमळीचा कार्यकर्ता आणि तत्कालीन समाजवादी परंपरेतील निर्भीड ,लढवय्ये नेतृत्व कायमचे पडद्याआड गेले. बापूसाहेब गेल्या नंतर यांचे अतुलनीय कार्य पुढील पिढीतील दोन्ही मुले, नातु मा.हेमकांत पाटील अध्यक्ष अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ आणि मा.संदिप घोरपडे सचिव अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ हे जोमाने नेत आहेत .असे थोर व्यक्तिमत्व, शिक्षण महर्षी माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीस *रयत संदेश* परिवाराकडून त्रिवार अभिवादन💐💐💐💐🙏🏼
रयतसंदेश न्युज नेटवर्क:- *महाराष्ट्र राज्य जुनी पेशन संघटना* आयोजित राज्य पेन्शन महाअधिवेशन-2024 जळगाव जिल्ह्यातील तमाम कर्मचारी बंधू भगिनींना विनंती आहे…