मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते विविध भागात रस्ते, योगा हॉल, सामाजिक सभागृह व भूखंड सुशोभीकरण शुभारंभ

रयतसंदेश न्युज:-

अमळनेर( प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध प्रभागात विकासकामांच्या भूमीपूजनाचा धडाका सुरू झाला असून याअंतर्गत विविध भागात रस्ते, योगा हॉल, सामाजिक सभागृह व भूखंड सुशोभीकरण आदी कामे होत आहेत.
अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध योजनेंतर्गत मंत्री अनिल पाटील यांनी ही कामे मंजूर केली असून यामुळे विविध प्रभागात नागरिकांची सोय होणार आहे.सलग दोन दिवस मंत्री पाटील यांनी विविध प्रभागात जाऊन या कामांचा शुभारंभ केला. प्रत्येक ठिकाणी त्यांचे वाजतगाजत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.विशेष करून अमळनेर शहरात केलेला शाश्वत विकास आणि नुकतीच मंजूर झालेली 197 कोटी ची 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना याबद्दल सत्कार करण्यात आला.

सकल जैन समाजासाठी 50 लक्ष निधीतून सामाजिक सभागृह

अमळनेर शहरातील सकल जैन समाजातील सर्व पंथासाठी भांडारकर कंपाऊंड येथे 50 लक्ष निधीतुन सामाजिक सभागृह मंत्री अनिल पाटील यांनी मंजूर केले असून या कामाचे भूमिपूजन देखील समस्त जैन व मारवाडी समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर कामाबद्दल सत्कार प्रसंगी मंत्री पाटील यांनी हे सभागृह जैन व मारवाडी समाजातील विविध धार्मिक कार्यक्रमांना तसेच बाहेर गावाहून आपल्या भूमीत येणाऱ्या सर्व गुरुमहाराज यांना निवास व विश्रांतीसाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले.

विविध प्रभागात ही आहेत विकासकामे,,,

तांबेपुरा भागात गायत्री नगर ते वैभव नगर भागात रस्ता काँक्रीटीकरण रक्कम 80 लाख, वैभव नगर भागात रस्ते काँक्रीटीकरण रक्कम 25 लाख, प्रभाग क्रं.1केशव नगर भागात काँक्रीटीकरण रक्कम 50 लाख, गणेश काॅलनी मध्ये गट क्रं.3741 खुला भुखंड विकसित रक्कम 30 लाख, शिव काॅलनी भागातील रस्ते काँक्रीटीकरण रक्कम 50 लाख, सप्तश्रृंगी काॅलनी भागात रस्ते काँक्रीटीकरण रक्कम 30 लाख, शिव काॅलनी भागात गट क्रं.1457/1458/1447 विकसित रक्कम 40 लाख, प्रभाग 15 गट क्रं.1438/1439 योगा हाॅल बांधकाम रक्कम 30 लाख, विदयानगर व राधाकृष्ण नगर काँक्रीटरोड रक्कम 65 लाख, प्रभाग क्रं.मधुकर शुक्ल ते उत्कर्ष नगर भागात काँक्रीटी रोड रक्कम 65 लाख, गुंजाळ आप्पा ते एस.ओ.पाटील काँक्रीटी रोड रक्कम 20 लाख, प्रभाग क्रं.7 मध्ये लक्ष्मी नगर भागात काँक्रीटी रोड रक्कम 100 लाख, न्यु प्लाॅट भागात रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण रक्कम 75 लाख, गट क्रं. 3223 मारवाडी समाज सभागृह बांधकाम रक्कम 50 लाख, गुलमोहर काॅलनी 234 खुला भुखंड विकसित रक्कम 40 लाख, प्रभाग क्रं. 14 पाटीलगडी रस्ता काँक्रीटीकरण रक्कम 50 लाख, प्रभाग क्रं. 14h गुरुकृपा काॅलनी भागात रस्ते काँक्रीटीकरण रक्कम 50 लाख, भालेराव नगर 1390 खुला भुखंड विकसित रक्कम 30 लाख,विदयानगर व राधाकृष्ण नगर भागात काँक्रीटरोड रक्कम 65 लाख, प्रभाग क्रं.मधुकर शुक्ल ते उत्कर्ष नगर भागात काँक्रीटी रोड रक्कम 65 लाख, गुंजाळ आप्पा ते एस.ओ.पाटील काँक्रीटी रोड रक्कम 20 लाख, प्रभाग क्रं.7 मध्ये लक्ष्मी नगर भागात काँक्रीटी रोड रक्कम 100 लाख, न्यु प्लाॅट भागात रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण रक्कम 75 लाख, गट क्रं. 3223 मारवाडी समाज सभागृह बांधकाम रक्कम 50 लाख, गुलमोहर काॅलनी 234 खुला भुखंड विकसित रक्कम 40 लाख, प्रभाग क्रं. 14 पाटीलगडी रस्ता काँक्रीटीकरण रक्कम 50 लाख, प्रभाग क्रं. 14 गुरुकृपा काॅलनी भागात रस्ते काँक्रीटीकरण रक्कम 50 लाख, भालेराव नगर 1390 खुला भुखंड विकसित रक्कम 30 लाख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page