रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
अमळनेर( प्रतिनिधी ) – मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ३२ कक्षांचे माध्यमातून सुरु असलेल्या कार्याला अधिक गतीने पुढे नेण्यासाठी व त्यांच्यात समन्वय राखण्यासाठी केंद्रीय कार्यकारिणीने ७ सदस्यांची एक “राज्य समन्वय समिती” गठीत केली आहे. प्रा. अर्जुनराव तनपुरे हे या समितीचे मुख्य समन्वयक आहेत. संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली ही समिती संपूर्ण राज्याचा दौरा करणार असून सेवा संघाचे कार्य वाढीसाठी तसेच सेवा संघाचे जुने व नविन पदाधिकारी यांच्यात समन्वय राखण्यासाठी कार्य करणार आहे. प्रदेशाध्यक्ष शिवश्री डॉ. विजय घोगरे, प्रदेश महासचिव शिवश्री चंद्रशेखर शिखरे व प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री नवनाथ घाडगे यांनी या समितीवर उत्तर महाराष्ट्रातून प्रतिनिधी म्हणून जळगाव जिल्ह्यातील मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवश्री सुरेश पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ नासिक विभागाचे वतीने त्यांचे शिवाभिनंदन.