मा.आ.साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह निमित्ताने सानेगुरुजी विदयालय अमळनेर, येथे जलकुंभ छात्रार्पण.

रयतसंदेश न्युज नेटवर्क:-

अमळनेर ( प्रतिनिधी)- आज रोजी सानेगुरुजी विदयालयात जलकुंभ छात्रार्पण मा.उदय मधुकर पाटील, अध्यक्ष ग.स.सोसायटी जळगांव आणि सहा.आयुक्त ( आरोग्य) म.न.पा.जळगांव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रस्ताविकात नुतन माध्य. मुख्खा सुनील पाटील यांनी शाळेच्या भविष्यातील वाटचली बाबत प्रकाश टाकला.मा.माध्यमिक मुख्खा तुषार पाटील यांनी सानेगुरुजी यावेळी मा.संचालक शामकांत भदाणे,मा.संचालक विद्याताई, आबा,मा.तुषार पाटील यांनी मा.अध्यक्ष ग.स.सोसायटी जळगांव यांनी आपल्या वक्तत्यव्यात सानेगुरुजी विद्यालयात गुणवत्ता पुर्ण शिक्षण दिले जाते याचा मला हेवा वाटतो.मला आपल्या शाळेचे संस्थापक समृतीशेष गुलाबराव पाटील यांचे सानिध्य लाभले ते माझे भाग्य समजतो.तुम्हाला येथे एकच सांगतो कि जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रयत्न करा तुम्हाला यश नक्की आहे.

मला आज जलकुंभ छात्रार्पण करण्यासाठी बोलावून उपकृत केले त्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.संदीप घोरपडे सर यांनी विचार मांडताना विद्यार्थी हा आमच्या शाळेचा केंद्र बिंदू आहे .खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थी साठी एक जलकुंभ असताना दुसरा जलकुंभ छात्रार्पण केले.आमच्या शाळेत, गांधीवाद , मातृह्मदयी सानेगुरुजीं चे संस्कार, मा.आ.गुलाबबापू च्या विचारांची पेरणी करतो. आमच्या शाळेत गुणवत्ता युक्त शिक्षण आणि  जगात पुढे काय वाढून ठेवले याचे दर्जेदार शिक्षण दिले जाते. कार्यक्रमात सानेगुरुजी विदयामंदिर येथील शिक्षक बापूराव पाटील( ठाकरे) यांना  मराठी साहित्य मंडळ ठाणे यांचा सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरावर पुरस्कार मिळाला त्या निमित्ताने अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मा.तुषार पाटील, मा.सचिन साळुंखे,मा.गुणवंत आप्पा पाटील,अँड.अशोक बाविस्कर,मा.भास्कर पाटील,मा.किरण पाटील,मा.अमृत पाटील,अध्यक्ष अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ.मा.हेमकांत पाटील सचिव.मा.संदीप घोरपडे सर. संचालक मंडळ,मा मुख्खा.सुनील पाटील, मुख्खा. श्रीमती अनिता बोरसे, मुख्खा संजीव पाटील. शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र रत्नपारखी  यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्खा.संजीव पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page