रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी *अमळनेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अनिल शिंदे देखील उपस्थित होते* डॉक्टर साहेबांनी विद्यार्थ्यांना संबोधित केल व त्यांचे मार्गदर्शन केल राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि प्रताप महाविद्यालयाचे करियर कौन्सलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली होती. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अरुण जैन होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आपले शिक्षण स्कील ओरिएंटेड असायला हवे. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयात जर्मन व जापनीज या भाषाही शिकवल्या जातील असे नमूद केले व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या निमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले पीएसआय धनंजय कोळी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रामाणिक काम केल्याने यश मिळू शकेल, मेहनतीवर विश्वास ठेवा, शिक्षणात सातत्य व धैर्य टिकवणे महत्त्वाचे आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेत यायचे असेल तर जिद्दीने आले पाहिजे.