श्री. र.सा. पाटील, प्राथमिक विद्यामंदिर, अमळनेर येथे पर्यावरण संरक्षण या विशेष उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची श्री.गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा.
अमळनेर रयतसंदेश न्युज:-
सदर कार्यशाळेत शाडू माती पासून विविध प्रकारचे गणेश मूर्ती बणविण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला या कार्यशाळेसाठी श्रीमती स्वप्ना पंढरीनाथ शिसोदे( मुख्याध्यापिका) व श्री सुरेश पवार (वरिष्ठ लिपिक) यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेसाठी अनंत कुमार सूर्यवंशी, सुरेखा पाटील, जागृती दहिवदकर, वैशाली साळवे ,बबीता चौधरी ,दिलवर सिंग पाटील ,प्रशांत पवार वैशाली चव्हाण ,नगराज सोनवणे ,श्रीमती मनीषा मुरलीधर व नलिनी बडगुजर यांचे सहकार्य लाभले या विशेष कार्यक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.