रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर ( प्रतिनिधी): -येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दिव्यचक्र चे संपादक संजय सूर्यवंशी यांची व्हाईस ऑफ मीडिया चे प्रदेशाध्यक्ष यांच्या मान्यतेनुसार साप्ताहिक विंग चे जळगाव जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. व्हॉइस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून संजय सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा केली.
व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांसाठी काम करणारी देशातील नंबर १ संघटना असून जगभरातील ४१ देशात ही संघटना काम करत आहे. संजय सूर्यवंशी यांचा पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव व्हाईस ऑफ मीडिया च्या संघटन व विकास कामी महत्त्वाचा ठरणार आहे. सकाळ श्रमिक संघ, नाशिक या संघटनेचे ते सलग सात वर्ष बिनविरोध अध्यक्ष राहिले आहेत. या काळात त्यांनी कर्मचारी बांधवांच्या प्रश्नांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. याशिवाय अखिल भारतीय वृत्तपत्र कर्मचारी महासंघ, नवी दिल्ली या संघटनेतही काही काळ सदस्य होते. सन २०१५ पासून तीन वेळा महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष होते. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.