*💐राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री शिवश्री ना.अनिलदादा पाटील यांचा मराठासेवा संघ जळगांव तर्फे शिवसत्कार*
अमळनेर प्रतिनिधी:-
शासकिय विश्राम गृह,पदमालय येथे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.शिवश्री अनिलदादा पाटील यांचा मराठासेवा संघाचे वतीने राजमाता जिजाऊ माॕसाहेब यांची मुर्ती ,शाल व पुश्पगुच्छ देऊन शिवसत्कार करण्यात आला.व भावी कारकिर्दिसाठी शिवशुभेच्छा दैण्यात आल्यात.यावेळी झालेल्या बैठकीत सामाजिक विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली.चर्चेत मंत्री महोदयांनी आपल्या मंत्री पदाच्या शपथ ग्रहण कार्यक्रमाचा आश्चर्य कारक प्रसंग सांगितला.चर्चेत प्रथितयश ऊद्योजक शिवश्री रामदादा पवार,सातपुडा अॕटो चे संचालक शिवश्री किरणदादा बच्छाव,ऊद्योजक शिवश्री धिरेंद्रदादा पाटील,मराठासेवा संघाचे प्रदेश ऊपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील सो,विभागिय कार्याध्यक्ष शिवश्री रामदादा पवार सो,मा.जिल्हाध्यक्ष शिवश्री सुरेशभाऊसो पाटील,महानगराध्यक्ष शिवश्री इंजि हिरामण चव्हाण रावसो,महानगर सचिव शिवश्री चंद्रकांत देसले रावसो,महानगर ऊपाध्यक्ष शिवश्री इंजि सचिन पाटील रावसो,आदि मान्यवर पदाधिकारी ऊपस्थित होते.