रयतसंदेश न्यूज नेटवर्क :-
चाळीसगांव ( प्रतिनिधी)-
आज रोजी चाळीसगांव विधानसभा निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण वर्गाचे तेली समाज मंगलकार्यालय, चाळीसगांव येथे थाटात उद्घाटन प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थीना मा.प्रशांत रघुनाथ पाटील (तहसीलदार, चाळीसगांव ) यांनी अभ्यास पुर्ण माहिती दिली. कर्मचाऱ्यांना आप आपल्या जबाबदारी ची जाणीव करून दिली. आणि आपण निवडणूकीचे काम आपण न डगमगता बिनधास्त प्रकारे पारपाडा.सर्व आधिकारी यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली.मा.नंदकुमार वाडेकर यांनी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या *चक्रीका* अँप बद्दल माहिती दिली.प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी प्रशिक्षण वर्गास संबोधित करतांना सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासना मार्फत यथोचित सहकार्य केले जाईल. परंतु जे कर्मचारी आपल्या कार्यात दिरंगाई करतील त्यांच्या वर योग्य ती कार्यवाही केली जाईल.प्रशिक्षण वर्गास माहिती देताना प्रवासाची,जेवणाची सोय उत्कृष्ट दर्जाची केली जाईल असे आवाहन करण्यात आले. प्रशिक्षण वर्गाला जवळपास 1700 कर्मचारींनी प्रशिक्षण घेतले. यावेळी मा.प्रांताधिकारी प्रमोद हिले,तहसीलदार,मा.प्रशांत पाटील, मा.नंदकुमार वाडेकर गटविकास अधिकारी, आर.एन.टी.मा.प्रथमेश मोहोळ,मा.संदेश निकुंभ, सहाय्यक मतदान अधिकारी मा सुधीर बच्छाव, मतदान सहाय्यक तुशार अहिरे.आणि मतदान केंद्राध्यक्ष, इतर कर्मचारी उपस्थित होते.


