अमळनेर :- रयत संदेश न्यूज नेटवर्क
लोकशाहीची खरी ताकद बूथ स्तरावर उभी राहते आणि संघटनेचे बळ कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून निर्माण होते, या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अमळनेर मतदारसंघाचा भव्य बूथ मेळावा अमळनेरात आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा शुक्रवार, दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बन्सीलाल पॅलेस येथे माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्यात आगामी राजकीय घडामोडी, संघटन मजबुती, तसेच बूथ स्तरावरील नियोजन आणि कार्यपद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘प्रत्येक बूथ अधिक सक्षम करण्यासाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे,’ सर्व बीएलए (बूथ लेव्हल एजंट), कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.आपली उपस्थिती ही केवळ सहभाग नसून संघटनेच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरेल, असे नमूद करत ‘एकजुटीने कार्य करून अमळनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्षम व प्रभावी बनवूया,’ असे आवाहन करण्यात आले आहे.




