२३ वर्षांनंतर धरणगाव कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टू गेदर उत्साहात

 

▪️“गेट टू गेदर” सोहळा ठरला संस्मरणीय व भावनिक..

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगाव : येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील बी.ए. वर्ष २००२ च्या बॅचचे पहिले गेट टू गेदर आज रोजी इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात सर्वांसाठी अत्यंत भावनिक आणि सस्मरणीय ठरला. या गेट-टुगेदर ला विविध ठिकाणाहून तब्बल ४० माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. यावेळी कॉलेज जीवनातील आनंदाचे क्षण, हास्यविनोद, आठवणी आणि जुनी मैत्री पुन्हा एकदा उजाळा देत “गेट टू गेदर” निमित्ताने कॉलेजचे माजी विद्यार्थी २३ वर्षांनंतर एकत्र आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बॅचचे समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र मराठे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन शिल्पा सूर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दीर्घकाळानंतर मित्रमंडळींना भेटल्याने सर्वचजण भावनिक झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जुन्या दिवसांची आठवण आणि पुन्हा एकदा महाविद्यालयीनचा काळात रमण्याचा आनंद झळकत होता.
कार्यक्रमादरम्यान सर्वच विद्यार्थ्यांनी कॉलेज काळातील काही विनोदी प्रसंग सांगत सर्वांना खळखळून हसवले. तर काहींनी शिक्षकांविषयी कृतज्ञतेचे भाव व्यक्त केले. संगीत, कवितांचे सादरीकरण, फोटो प्रेझेंटेशन आणि जुन्या आठवणींनी सजलेल्या या सोहळ्यात उपस्थितांनी एकमेकांसोबत फोटो काढून पुन्हा एकदा कॉलेजच्या आठवणी ताज्या केल्यात. आणि पुन्हा अशाच प्रकारे भेटीगाठींचा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्याचा निर्धार केला. यशस्वी आयोजनासाठी विनोद चौधरी, पंकज लोखंडे, अनिल पाटील, सम्राट सोनवणे, रवींद्र मराठे, बापू बाविस्कर, रवींद्र महाजन, तसेच शिल्पा सूर्यवंशी, जयश्री कोळंबे, विद्या पाटील, सविता अत्तरदे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page