76 वर्ष स्वातंत्र्याची!
गाणी गाऊया देशभक्तीची!!
अमळनेर प्रतिनिधी :-बापूराव ठाकरे.
अमळनेर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी रात्री राष्ट्र सेवादलाचे वतीने वर्षोनुवर्षे सुभाष चौकात राष्ट्रध्वजास वंदन करून सलामी दिली जाते. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे नेतृत्वाखाली मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून श्री मंगळ ग्रहमंदिर ते सुभाष चौकापर्यंत मध्यरात्री मशाल घेऊन मिरवणूक काढली जाते. महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले जाते .सुभाष चौकात भव्य कार्यक्रमात भारतीय तिरंगा फडकावून सलामी दिली जाते .
या वेळी *व्हाईस ऑफ मीडिया व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर शाखेच्या वतीने* अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे.
*या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत* सहभागी व्हावे व हा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पाठवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
■कोणतेही संगीत वा वाद्य आणायची आवश्यकता नाही, आयोजक देखील अशी सुविधा देणार नाही.. केवळ उपलब्ध साऊंड सिस्टीमचा वापर करून देशभक्तीपर कोणतेही गाणे म्हटले तर चालणार आहे! स्वत:ची वाद्यव्यवस्था (ढोलगी वा तत्सम वाद्य) आणली तर स्वागतच आहे। पण मुक्त गीत म्हटले तरी चालेल.
■ कार्यक्रम १४ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. नावनोंदणी कार्यक्रमस्थळीच होईल.
■वयोगटाचे बंधन नाही, सर्व वयोगटातून पुढील बक्षिसे देण्यात येतील.
प्रथम- 1100
द्वितीय -700
तृतीय- 500
चतुर्थ-300
उत्तेजनार्थ प्रत्येकी 100 रुपयांची 4 बक्षिसे! या सर्व बक्षिसांचे प्रायोजक मंगळग्रह सेवा संस्था आहे .
किमान १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजे पर्यंत नाव नोंदणी केली त्यांनाच स्पर्धेत पात्र धरण्यात येईल!
स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क नाही. तसेच वयोगट वा संगीत साहित्याची अट नाही.
स्पर्धा खुल्या वातावरणात होणार असून पाणी पाऊस वा असेल त्या वातावरणात देशावरील प्रेम व्यक्त करण्याचा हेतू असेल त्यांनी जरूर सहभागी व्हावे.
स्पर्धेचे बक्षीस वितरण २२ ऑगस्ट रोजी मंगळग्रह मंदिर येथे होईल व त्याचा तपशील सहभागी स्पर्धकांना कळविला जाईल.
स्पर्धा संपन्न झाल्या बरोबर १२ वाजून.१ मिनिटांनी होणाऱ्या ध्वजवंदनास करून थांबणे बंधनकारक आहे.
अगदी बाल गटातील विद्यार्थी, विद्यार्थीनी,स्पर्धक सहभागी होत असतील तर जबाबदार पालकांना सोबत आणावे.किंवा तशी सोय नसल्यास नोंदणी करते वेळी सांगितले तर आयोजक घरापर्यंत पोहचविण्याची जाबाबदारी घेऊ शकतील.