राष्ट्रीय एकतेसाठी धाव” धरणगाव पोलिस स्टेशनतर्फे Run for Unity उपक्रमाचे आयोजन..

 

धरणगाव प्रतिनिधी : रयत संदेश न्यूज

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार रोजी “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून, मा. पोलिस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव पोलिस स्टेशन तर्फे “Run for Unity – एक दौड देश की एकता और अखंडता के लिए” हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रन फॉर युनिटी कार्यक्रम दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता सुरू होणार असून, प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश देशातील ऐक्य, अखंडता आणि एकात्मतेचा संदेश समाजात पोहोचविणे हा आहे. धरणगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक श्री. सुनील पवार यांनी या उपक्रमासाठी आवाहन करताना सांगितले की, राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे धरणगाव शहरातील सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्ष, पत्रकार बांधव तसेच सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
‘Run for Unity’ या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करण्यासोबतच समाजातील एकजूट व ऐक्य वाढविण्याचा संदेश दिला जाणार आहे. कार्यक्रमात पोलिस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page