महाविद्यालयीन बेसबॉल,(पुरुष व महिला) क्रीडा स्पर्धा. दि.14 डिसे.कला महाविद्यालय, मारवड येथे संपन्न झाल्या.

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. एरंडोल विभाग आंतर महाविद्यालयीन बेसबॉल,(पुरुष व महिला) क्रीडा स्पर्धा. दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड या ठिकाणी संपन्न झाल्या. यामध्ये पुरुषांचे चार संघ व महिलांचे चार संघ हजर होते. सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंतराव देसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या समवेत प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.सतीश पारधी, डॉ. सचिन पाटील, डॉ.खुशाल देशमुख, एरंडोल विभागाचे सचिव डॉ.शैलेश पाटील व स्पर्धा आयोजन सचिव डॉ.देवदत्त पाटील हे उपस्थित होते.

उपस्थित खेळाडूंना प्राचार्य डॉ. देसले यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेमध्ये पुरुषांचा अंतिम सामना बी.पी .आर्ट्स एस. एम. ए.सायन्स के.के.सी कॉमर्स कॉलेज,चाळीसगाव महाविद्यालय विरुद्ध धनदाई महाविद्यालय, अमळनेर यामध्ये झाला. स्पर्धेत चाळीसगाव संघ अंतिम विजेते ठरले. तसेच मुलींमध्ये चाळीसगाव महाविद्यालय विरुद्ध प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्यात अंतिम सामना झाला. यामध्ये बी.पी .आर्ट्स एस. एम. ए.सायन्स के.के.सी कॉमर्स कॉलेज,चाळीसगाव महाविद्यालय विजयी झाले. या स्पर्धेकरिता पंच म्हणून जयेश मासरे , चंद्रशेखर अहिरे, निखिल पाटील व दक्ष पाटील यांनी परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. देवदत्त पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page