अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जिल्हा जळगाव आयोजित *महासंघ चषक2026 आपल्या जळगाव तालुका महासंघाने जिंकला….*
यंदा पहिल्यांदाचं आपल्या संघाला विजेतेपद मिळाले *कर्णधार पराग सरोदे* यांच्या नेतृत्वाने आणि मैदाना वरील अचूक रणनीतीने चषक जळगाव तालुक्याच्या शिरपेचात आला….
*निलेश मोरे यांच्या अध्यक्षतेत आणि सचिव राहुल चौधरी* सरांच्या नियोजनाने तसेच सर्व *संघाच्या उत्कृष्ट कामगिरीने* चषक आपल्या तालुक्यात सन्मानाने आणता आला..
यासाठी *ग.स.संचालक श्री योगेश इंगळे,श्री.मानव भालेराव* यांनी जळगाव संघाला *प्रयोजक्तव* देऊन दाखवलेल्या विश्वासाला आपला संघ खरा उतरला…आपले सर्व शिक्षक -शिक्षकेतर बांधवांचे आशिर्वाद रुपी सदिच्छा परिणामकारक ठरल्या… आपल्या तालुका संघांचे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर *महासंघाच्या राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी* यांच्या माध्यमातून भरभरून कौतुक करण्यात आले…….
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




