मंगळग्रह मंदिरात मंगलध्वनी च्या जयघोषात श्री विद्याविनायक यागास प्रारंभ

अमळनेर रयत संदेश न्यूज नेटवर्क –

येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे श्री गणेश जयंती व वसंत पंचमीनिमित्त गुरुवार, दि. 22 जानेवारी रोजी सकाळी मंगलसुरांच्या जयघोषात श्री विद्याविनायक यागास प्रारंभ झाला. सायंकाळी श्री मंगळग्रह देवांच्या महाआरतीने प्रथम दिवसाची सांगता झाली. यानिमित्ताने श्री मंगळग्रह मंदिरात बुद्घीच्या देवतांचा भरभरून आशीर्वाद लाभत आहे. शुक्रवार, दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत 9 विद्यार्थिनींकडून सरस्वती देवींचे हवन करण्यात येईल. त्यानंतर आरती होऊन यागाची सांगता होईल.

गुरुवार, दि. 22 जानेवारी रोजी शिरीष डहाळे सर यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करून श्री विद्याविनायक यागाचा प्रारंभ झाला. गणपती पूजन, पंचांग कर्म, गणेशभद्र, गौरी तिलक, नवग्रह, रुद्र आदी विशिष्ट मंडलांची स्थापना झाली. गणपती व सरस्वती देवींचे महाअभिषेक तसेच मोदक आणि पायस आदी द्रवाने विशेष हवन होऊन बलिदान पूर्णाहुती करण्यात आली. याप्रसंगी जी. एस. हायस्कूलच्या हर्षल पाटील, कृष्णागर पाटील, विराज परदेशी, लोकेश पाटील, आयुष पाटील, नील ठाकरे, स्वामी पाटील, हिमांशू वाघ व कृष्णदास बाविस्कर या 9 विद्यार्थ्यांनीही सहभाग नोफ्लदविला. या यागाला पुरोहित केशव पुराणिक, सारंग पाठक, शुभम्‌‍ वैष्णव, प्रसाद भंडारी, यश जोशी, परशुराम शर्मा, अथर्व कुलकर्णी, चंद्रकांत जोशी, वैभव लोकाक्षी, मंदार कुलकर्णी व जयेंद्र वैद्य यांनी पौराहित्य केले.

श्री विद्याविनायक यागाचा उद्देश

श्री विद्याविनायक यागाचा उद्देश म्हणजे युवापिढीचे होणारे अधःपतन थांबून त्यांना ऊर्जा व सत्मार्ग लाभावा, हा आहे. यासाठी श्री गणेश जन्मोत्सव व सरस्वती जन्मोत्सवाचे औचित्य साधून बुद्धिवर्धक स्तोत्राचे जसे गणपतीअथर्वशीर्ष स्तोत्राचे एक हजार आवर्तन करून श्री मंगलेश्वर गणेशजींना अभिषेक व एक हजार मोदकांचे हवन करण्यात आले. शुक्रवार, दि. 23 जानेवारी रोजी जी. एस. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून गणेशस्तोत्र व प्रज्ञाविवर्धनस्तोत्र यांचे पाठ करवून घेण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page