अमळनेर:- रयत संदेश न्यूज
येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नंदुरबार येथे घडविलेले गुंडगिरीचे कृत्य अमळनेरच्या संस्कृतीसाठी अशोभनीय असून या हिंसक कृत्याने सारा महाराष्ट्र हादरला आहे,याचे सारे पुरावे देखील सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाले आहेत.स्वतःला लोकप्रतिनिधी संबोधणारी अशी घातक प्रवृत्ती कायद्याच्या चौकटीत अतिशय गंभीर गुन्ह्यात अडकली असल्याने अमळनेरकर जनतेने त्यांना कायमचे बाजूला सारावे अशी विनंती वजा आवाहन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
*लाव रे तो व्हिडीओ* -यावेळी नंदुरबार मध्ये घडलेल्या प्रकाराचे सारे व्हिडिओ त्यांनी “लाव रे तो व्हिडीओ” म्हणत मोठ्या डिजिटल स्क्रीनवर पत्रकारांना दाखवून ऍक्शन ला रिएक्शन कशी झाली ते दाखवत सुरुवात चौधरी यांनीच केल्याचे स्पष्ट केले.पुढे बोलताना ते म्हणालेत की अमळनेरची संस्कृती टिकविण्यासाठी माझी तळमळ व भूमिका जनतेने लक्षात घ्यावी.सत्तेची मस्ती आल्याने पद मिळताच चौधरी यांच्या पुत्रांनी विरोधी भाजपाच्या गटास चिथावणी देणारे हावभाव करून चिडविण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर समोरील भाजपाचा गट चिडला होता.चौधरी बंधू एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी दोन्ही बंधू,त्यांचे सुपुत्र व कार्यकर्त्यांची मोठी टोळी विरोधी भाजपा कार्यकर्त्याच्या घरी नेऊन घरात घुसत त्यांना कपडे काढून अमानुष मारहाण केली.धमक्याही दिल्या.विशेष म्हणजे तेथे माजी आमदारांना आपण अगदी एखाद्या गुंडाप्रमाणे झुंडशाही करताना व्हिडीओमध्ये पाहिले.
एवढे सारे घडल्यानंतर ऍक्शन ला रिऍक्शन होणे साहजिकच आहे.त्यामुळे त्याच रात्री मोठ्या संतप्त जमावाने यांच्या घरावर हल्ला केला हे स्पष्ट आहे.घरावर हल्ला झाल्यानंतर यांनी सुरवातीला आम्ही किती निरपराध असल्याचा आव आणला पण जेव्हा समोरच्या गटाला मारहानीचे व्हिडीओ बाहेर आलेत तेव्हा सारे सत्य बाहेर आले.
खरेतर लोकप्रतिनिधी झालेल्या कुटुंबाने असे गुंडगिरीचे दर्शन घडविणे नंदुरबारच नव्हे तर संतांची भूमी असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठीच अशोभनीय आहे.त्याठिकाणी पोलिसांनी यांच्या मिरवणुकीला परवानगी दिलीच कशी हा माझा नंदुरबार पोलीस प्रशासनास सवाल आहे?
पुढे ते म्हणाले की अमळनेर मतदारसंघात आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेलेत पण कुणाच्या घरावर हल्ले झालेले आठवत नाहीत.किंवा येथील लोकप्रतिनिधीनीही कुणाच्या घरी जाऊन हल्ले केलेले आठवत नाही.कारण अमळनेरची ही संस्कृतीच नाही.आणि ही गुंडगिरीची संस्कृती अमळनेरकरानाही नकोच आहे.विकास कामे करीत असताना विरोधी गटाचे काही कार्यकर्ते सोशल मीडियावर माझ्यावर सतत टीका करत असतात आम्ही ते खिलाडू वृत्तीने घेतो,यासाठी आम्ही कुणाला शिवीगाळ किंवा मारहाण केल्याचे एकतरी उदाहरण दाखवून द्यावे.याउलट यांच्या विरोधात एखाद्या कार्यकर्त्याने थोडेफार जरी केले तरी इतरांमार्फत धमक्या देऊन काहीतरी नुकसान नक्कीच हे करीत असतात.म्हणजेच एकप्रकारे दहशतीचे राजकारण ते करीत असून नंदुरबार व अमळनेरकर जनतेसाठी ते घातक आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांना सहकार्य मात्र हे नकोच
यासंदर्भात बोलताना आमदार पाटील म्हणाले की या भूमीतील असलेले नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील यांना विनम्र आवाहन आहे की तुम्हाला जनतेने कौल दिला आहे.आम्हाला त्याचे काहीच वाईट वाटत नाही.याउलट जनतेचा कौल मान्य असल्याने आमदार म्हणून विकासासाठी व चांगल्या कामासाठी माझे सहकार्यच राहील.परंतु अश्या गुंड प्रवृत्तीला नेतृत्व देऊन अमळनेरचे नुकसान करू नका तसे केल्यास जनतेशी विश्वासघात होऊन अमळनेरची भोळीभाबळी जनता तुम्हाला माफ करणार नाही असा सूचक इशारा त्यांनी दिला.
तसेच पालिका निवडणूकीनतंर अमळनेर येथेही वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न यांनी केला होता त्यास जोरदार उत्तर या भूमीतील महिला भगिनी व जनतेने दिल्याचे साऱ्यांनी पाहिले.एवढे होऊनही आपली अमळनेरची काही मंडळी नंदुरबार येथे वादाच्या दिवशी तेथे होती.किमान आपल्याला बट्टा लागेल असे त्यांनी वागू नये.आपण सारे जाती धर्मीय या भूमीत गुण्यागोविंदाने नांदत आहोत,स्वार्थासाठी कुणी मिठाचा खडा टाकत असेल तर आताच सावध व्हा.माझा हा लढा अमळनेरची संस्कृती टिकवण्यासाठी असून दुसरा कोणताही स्वार्थ नाही.त्यामुळे माझी कळकळ समजून घ्या,शेवटी जैसी करणी वैसी भरणी होतेच, कायद्यासमोर कुणीही मोठे नाही,तुम्ही कोणत्याही पक्ष्यात जा चुकीला माफी नाही,आणि अश्या प्रवृत्तीचे शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे साहेब हे देखील समर्थन करणार नाही.त्यामुळे एट्रोसीटी,विनयभंग,दरोडा असे अनेक गंभीर गुन्हे दोन्ही चौधरी बंधू आणि इतरांवर दाखल झाले असून कोणत्याही क्षणी अटक होण्याची चिन्हे आहेत.याआधी 2016 च्या पालिका निवडणुकीत यांचे दहशतीचे कृत्य आपण अनुभवलेच असून त्याची पुनरावृत्ती नको असेल तर आजच यांना दूर करा,आपली एकजूट ठेवा कुणाच्या नादी लागू नका असे आवाहन त्यांनी तमाम जनतेस केले.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पोलीस महानिरीक्षकांची घेणार भेट
नंदुरबार येथील घटनेसंदर्भात त्या जिल्ह्याचा माजी पालकमंत्री या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,पोलीस महानिरीक्षक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देत यांनी केलेल्या गुंडगिरीची सखोल चौकशी करण्याची मागणी आपण करणार असून विधानसभेत देखील आवाज उठविणार असल्याचे आमदारांनी सांगितले.


