अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी समाजकार्य महाविद्यालय चोपडा आणि वैजापूर वनक्षेत्र विभाग वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनवा जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले.वैजापूर या गावी समाजकार्य महाविद्यालयातील तृतीय वर्षाचे विद्यार्थी क्षेत्र कार्यअंतर्गत सामुदायिक संघटन कार्याच्या विविध पायऱ्यांचा उपयोग करून गावांमध्ये जनजागृती करत असतात. या अभियानाच्या माध्यमातून बीएसडब्ल्यू तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जंगलामध्ये वनवा कसा पेटतो आणि त्यावर उपाय योजना कशा कराव्यात या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. विकेश ठाकरे आणि वनरक्षक श्री. विजय शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. विकेश ठाकरे यांनी जंगल संवर्धन व त्यांचे संरक्षण याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. तसेच जंगल संरक्षणामध्ये वनवा पेटू नये म्हणून घेण्यात येणाऱ्या खबरदारी विषयी माहिती दिली.श्री. विजय शिरसाठ यांनी क्षेत्र कार्य करत असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच वनरक्षणासाठी ग्रामीण भागामधील लोकांमध्ये जनजागृती करावी याविषयी विद्यार्थ्यांना संबोधित केले. समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील बीएसडब्ल्यू तृतीय वर्ष क्षेत्रकार्य समन्वयक प्रा. डॉ. मारोती गायकवाड यांनी समाजकार्य शिक्षण आणि ग्रामीण भागाचा विकास यामध्ये वृक्ष रोपणा बरोबर त्यांच्या संवर्धनाविषयी माहिती दिली.
सदरील कार्यक्रमासाठी बीएसडब्ल्यू तृतीय वर्षातील विद्यार्थी पावरा चांदनी, गावित सुहानी,पाडवी वसंती,पाडवी रीकिता, तडवी शकीला,पावरा वंदना,बागुल अभय,सोयाब तडवी,पावरा नितीन, पावरा दीलवरसिंग इत्यादी उपस्थित होते.सदरील अभियानाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदणकर, उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, क्षेत्रकार्य समन्वयक प्रा. डॉ. मारोती गायकवाड आणि बीएसडब्ल्यू तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले



