पत्रकार,रवींद्र मोरे यांचा चर्मकार समाजातर्फे सपत्नीक सत्कार

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित झालेले ‘महादर्पण’चे मुख्य संपादक रवींद्र मोरे यांचा चर्मकार समाजातर्फे घरी जाऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. समाजातील मान्यवरांनी पुष्पहार, शाल-श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला.

रवींद्र मोरे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न, अन्यायाविरुद्धची भूमिका आणि जनहितासाठी सातत्याने कार्य केले असल्याने त्यांच्या या सन्मानाबद्दल समाजात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सत्कार सोहळ्यास पारोळाचे गटविकास अधिकारी संजय मोरे, मुक्ताईनगरचे गटशिक्षणाधिकारी वसंत मोरे, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक प्रभाकर क्षिरसागर, प्रा. शि. दिनेश मोरे, मनेश मोरे, माध्यमिक शिक्षक अजय विसावे, नगरपरिषद कर्मचारी विजय विसावे, प्रा. शि. शिवाजी आप्पा बाविस्कर, मीना क्षिरसागर, प्रियंका विसावे, जयश्री विसावे, ज्योती मोरे, संगीता मोरे, प्रतिभा मोरे, माधुरी सोनार, छाया बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी वक्त्यांनी सांगितले की, “रवींद्र मोरे यांनी पत्रकारितेतून समाजातील वंचित घटकांचे प्रश्न मांडत सत्याचा शोध घेतला. त्यांच्या कार्यामुळे तरुण पत्रकारांना प्रेरणा मिळाली आहे.”

सत्काराला प्रतिसाद देताना रवींद्र मोरे यांनी कृतज्ञता व्यक्त करत म्हटले, “हा सन्मान माझ्या लेखणीच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कार्याचे फलित आहे. समाजाचा हा स्नेह माझ्या कार्याचा मोठा प्रेरणास्त्रोत ठरेल.”

या कार्यक्रमामुळे अमळनेर परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत असून, समाजबांधवांत उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page