दुबईस्थित आंतरराष्ट्रीय कंपनीत चोपडा तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांना भरघोस पॅकेज.*

चोपडा प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

चोपडा : येथील “महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), मध्ये दिनांक १६/०५/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह” ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनी Indus International FZC दुबईजवळील शारजाह येथे स्थित यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये पहिल्या फेरीत महाविद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमासाठी कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक मा.श्री.निलेश खैरनार हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे प्राचार्य मा.प्रा.व्ही.एन.बोरसे, सर्व विभागप्रमुख, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा.भूषण जे पवार, प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रा.एम.एस.पाटील यांनीही विद्यार्थांना मार्गदर्शन केले व कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, निवड प्रक्रिया तसेच आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रसंगी “विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, कौशल्य आणि शिस्त यांच्या जोरावर जागतिक स्तरावरील संधींचा लाभ घ्यावा,” असे प्रतिपादन प्राचार्य मा. प्रा. व्ही. एन. बोरसे यांनी केले.विद्यार्थ्यांनीही आत्मविश्वासाने मुलाखत प्रक्रियेत सहभाग नोंदविला.पहिल्याच फेरीत १० विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव मा. डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षण व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तसेच दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.सदर प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. भूषण जे. पवार यांनी केले होते.या यशस्वी प्लेसमेंट ड्राइव्हमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page