खान्देशांतील संस्कृती टिकविण्यासाठी “आखाजी महोत्सव”!

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

खान्देशांतील ग्रामीण संस्कृती टिकविण्यासाठी “आखाजी महोत्सव” एक वरदान ठरणार आहे. लुप्त होत असलेली लोकगीते, आखाजीचा झोका तसेच पारंपरिकेला उजाळा देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन खान्देश साहित्य संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा प्रसिद्ध गझलकार शरद धनगर यांनी केले.

येथील प्रताप महाविद्यालयात झालेल्या खान्देश साहित्य संघाच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी व सदस्यांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. जिल्हा सचिव उमेश काटे, जिल्हा उपाध्यक्ष डी ए धनगर, जिल्हा कार्याध्यक्ष वाल्मिक मराठे-पाटील, साहित्यिक प्रा डॉ रमेश माने, पूज्य साने गुरुजी शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ कुणाल पवार, तालुकाध्यक्षा सुनीता पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इतिहास संशोधक (कै.)डॉ जयसिंगराव पवार, पत्रकार (कै.) योगेश महाजन यांच्यासह ज्ञात-अज्ञात साहित्यिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त राजू बाविस्कर यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. यात प्रदीप कंखरे, डॉ कुणाल पवार, उमेश काटे, मनोहर नेरकर,दत्तात्रय सोनवणे, सिमा पाटील, पूजा पाटील, सुदर्शना पाटील, ज्ञानेश्री पाटील, शोभा शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर यावर्षी खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार दर वर्षी अहिराणी लोक वाङ़मय दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर “आखाजी महोत्सव” साजरा करण्यात येणार आहे. यात गवराई सारखे सण पुनर्जिवीत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी रत्नाकर पाटील, रामेश्वर भदाणे, अशोक पाटील, निरंजन पेंढारे,गोपाल हडपे, दत्तात्रय सोनवणे, छाया ईसे, सिमा पाटील, भावना पाटील, पूजा पाटील, ज्ञानेश्री पाटील, सुदर्शना पाटील, रेखा मराठे, शोभा शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page