अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांच्या भविष्याशीघात करणाऱ्या NEET पेपरफुटीप्रकरणाच्या निषेधार्थ अमळनेर PTA
तसेच शैक्षणिक संस्था प्रमुख यांच्यावतीने सोमवार, दि. 18 मे रोजी प्रांतकार्यालय परिसरात शांततामय
पद्धतीने लोकशाही मार्गाने आंदोलनकरण्यात आले. यावेळी अमळनेरचेप्रांताधिकारी मा. श्री. मयूर भंगाळेसाहेब यांना निवेदन सादर करण्यात
आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर
PTA चे अध्यक्ष श्री.भैय्यासाहेबमगर सर यांनी केले. शिक्षणक्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व मा.
श्री. संदिप घोरपडे सर यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्यामेहनतीशी व भविष्याशी होणारीतडजोड असह्य असल्याचे सांगत
दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
PTA तर्फे सौ. सुरश्री वैद्य मॅडम
तसेच श्री. सुधीर टाकणे सर यांनीमनोगत व्यक्त केले. NEETअन्यायग्रस्त विद्यार्थी लावण्या
सातपुते व अजिंक्य पाटील यांनीआपल्या भावना व्यक्त करतविद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि
अन्याय अधोरेखित केला.यावेळी “विद्यार्थ्यांच्या भविष्याशीतडजोड नाही”, “पेपरफुटीकरणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीचपाहिजे” अशा घोषणा देत शांततामयपद्धतीने निषेध व्यक्त करण्यात
आला.
सदर आंदोलनात श्री. किरण माळीसर, श्री. राकेश बडगुजर सर,सौ. सुरश्री वैद्य मॅडम, श्री. ज्ञानेश्वर
मराठे सर, श्री. नागराज माळी सर,श्री. हर्षल बडगुजर सर, श्री. स्वर्णदीप राजपूत सर, श्री. संदीप
महाजन सर, श्री. सुधीर टाकणे सर ,श्री. ज्ञानेश्वर साळुंखे सर ,श्री.अविनाश कोळी सर, श्री. सुनील
पाटील सर आदी PTA क्लास संचालक उपस्थित होते.




