जैन सोशल ग्रुप व Rotaract क्लब अमळनेर यांनी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी थंड पे खाद्यपदार्थ व औषधी चे स्टॉल लावून दिली सेवा..* 

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

 

अमळनेर पंचक्रोशीतील भाविकांच्या सेवेसाठी *जैन सोशल ग्रुप* व *Rotaract क्लब* अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने लोंढवे फाट्याजवळ वृंदावन गार्डन ढाबा च्या समोर

सेवा प्रकल्प च्या दरम्यान पायी प्रस्थान करणाऱ्या भाविकांसाठी खाद्यपदार्थ, थंडपेय, चॉकलेट, बिस्किट तसेच भाविकांसाठी प्राथमिक उच्चार साठी सचिन एजन्सी,सेवा मेडिकल ,धनश्री मेडिकल यांच्या सहकार्यातून जखमांचे मलम,गोळ्या ,पेन किलर इतरऔषधी ,आणि उष्णतेपासून बचाव साठी ग्लुकोस चे पाऊच दिल्याने पायी जाणाऱ्या भाविकांना मोठा आधार मिळाला. जो तो आपल्या परीने डीजे लावून भाविकांचे स्वागत करत होते. “मानव सेवा हीच खरी जनसेवा” च्या ध्यास घेऊन जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष सचिन पारख सेक्रेटरी महावीर सिंघवी व माजी अध्यक्ष सौरभ जैन व माजी सेक्रेटरी प्रितेश जैन प्रकल्प प्रमुख सचिन चोपडा व सर्व JSG सभासदांनी आपली सेवा प्रदान केली यास जोड म्हणून Rotaract क्लबचे अध्यक्ष ध्रुव पारख व सेक्रेटरी निधीश कोचर, प्रकल्प प्रमुख हेमांग झाबक ,कृष्णा वर्मा आदीसह Rotaract क्लब सदस्यांनी मोलाचे सहकार्य देऊन आपला सेवाधर्म निभवला

अशी माहिती जैन सोशल ग्रुपचे पीआरओ कीर्तीकुमार कोठारी यांनी पुरवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page