नगरपरिषदेच्या प्रलंबित विकास कामांचा आढावा बैठकीत अमळनेर उपनगराध्यक्ष प्रशांतदादा निकम यांची विशेष उपस्थिती

जळगांव प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

जळगांव येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा मा.नामदार भाऊसो श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई,महावितरण तसेच नगरपरिषदेच्या प्रलंबित विकास कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष या नात्याने अमळनेर शहरातील सुरू असलेल्या भुयारी गटर चे गेल्या 10 वर्षांपासून कार्यारंभ आदेशामिळून 8 वर्षापासून सुरु असलेले कामाची गुणवत्ता आणि शहरातील तुंबलेले चेंबर, रस्त्यावर येणारे पाणी, भुयारी गटारी च्या नावाने नाल्यात सोडलेले पाणी, शहरात सर्व रस्ते खोदून 70 कोटी निधी हा वाया गेल्याचा थेट आरोप MGP वर केला,सदरील योजना लवकरच कार्यान्वयीत करा अशी तंबी मंत्री महोदयांनी MGP ला दिली.शासनाकडे प्रस्तावित कामांबाबत माहिती देऊन तसेच नवीन विकास कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळणे बाबत विनंती केली त्याला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी बैठकीत उपस्थित महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.श्री संजयजी सावकारे, अमळनेर मतदार संघाचे आमदार मा.श्री अनिल पाटील,चोपडा मतदारसंघाचे आमदार मा.आण्णासाहेब श्री चंद्रकांतजी सोनवणे, रावेर मतदार संघाचे आमदार मा.श्री अमोलजी जावळे,मा.जिल्हाधिकारी साहेब,जिल्हा परिषद सीईओ मॅडम, तसेच सर्व विभाग प्रमुख,अधिकारी वर्ग, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page