अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क
अमळनेर….नुकत्याचअहिंल्यानगर येथे संपन्न झालेल्या छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय 6वे ग्रामीण साहित्य संमेलन व “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा २०२६” संपन्न झाला.
या सोहळ्यात महाराष्ट्रातील कवी , लेखक , गायक , ग्रामीण साहित्यीक , पोवाडाकार , लावणी सम्राट , प्रबोधनकार अश्या क्षैत्रातील मान्यवंर उपस्थित होते.
ग्रामीण संस्कृती जपण्यासाठी ग्रामीण साहित्य जपणे व संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधुन महाराष्ट्र शैक्षणिक व विविध क्षैत्रात कार्य करण्यां-या शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने शाल , श्रीफळ , बुके , सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
द्रौ रा कन्या शाळेचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक श्री .एस पी वाघ यांना (छ.संभाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्कार) ,, श्री हिरालाल रमेश बाविस्कर सर के पी सनेर माध्यमिक विदयालय जैतपीर येथील क्रीडाशिक्षक ( राज्यस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार ) , श्री गोकुळ विक्रम बोरसे स्व. सौ.पद्मावती नारायणदास मुंदडा हायकुलचे क्रीडा शिक्षक यांना ( गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार ) देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानीत करण्यात आले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वाकडुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे.




