सायकल प्रवास…कष्टाचे शिक्षण…
व इ.10वी-तिन्ही शाळेतून इंग्लिश
विषयात सर्वप्रथम.
अमळनेर रयतसंदेश न्युज:-
कु.साक्षी राजेंद्र पाटील(डी.आर.
कन्या हायस्कूल तसेच साई इंग्लिश
अकॅडमिची गुणी विद्यार्थिनी)
कु.साक्षी पाटील-अमळनेर
तालुक्यातील लोण या मूळ गावी
राहणारी.परिस्थिती बेताचीच…
वडील शेतकरी.
अमळनेर येथून 6 किलोमिटर
अंतरावर असलेले-तासखेडे हे मामांचे
गाव…येथूनच साक्षी ताई उन्हाळी
सुट्टीत दोन महिने सायकलवर
क्लासला आली….शाळेला उन्हाळी
सुट्टी असल्याने-ST बसची पास
मिळत नाही म्हणून…क्लासला
सायकल वर यायची…घामाने
भिजूनच क्लासमध्ये प्रवेश
करायची…मी संपूर्ण भरलेल्या
क्लास समोर…साक्षी ताई खरोखरच
कष्टाचे शिक्षण घेत आहे,असे
म्हणायचो…त्यानंतर सर्वच विद्यार्थी
साक्षी ताईला साक्षी ऐवजी कष्टाचे
शिक्षण म्हणूनच हाक मारू लागले.
इ.10 वी बोर्डाचा रिझल्ट लागला…
मला फक्त एवढेच माहित होते की-
साक्षी ताईला इंग्लिश विषयात 94 गुण
आहेत…नुकताच डी.आर.कन्या
शाळेचा गुणी विद्यार्थी बक्षिस वितरण
सोहळा झाला व साक्षी ताईला या
सोहळ्यात गौरविण्यात आले व
ज्यावेळी ती क्लासला आली व मी
खा.शि. मंडळाच्या तिन्ही शाळेतून
(डी.आर कन्या,जी.एस.व
प्रताप हायस्कूल)इंग्लिश विषयात
सर्वप्रथम आली आहे…असे आनंदाने
सांगत होती आणि पेढे देऊन
म्हणाली-मगर सर,सायकल…कष्टाचे
शिक्षण आठवतंय का?