अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य कुशल सभापती अशोक आधार पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिलदादा पाटील यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता “वही तुला” व अभिष्टचिंतन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी समितीचे उपसभापती व संचालक मंडळ ,कर्मचारी,व्यापारी,गुमास्ता, हमाल, मापाडी व कर्मचारीयांचेवतीने अशोक पाटील यांची “वहीतुला” करण्यात येणार आहे. सदर वह्या गरीब,गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिलदादा पाटील,
मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचेसह मान्यवर उपस्थित राहणार आहे.तरी सदर कार्यक्रमास शेतकरी बांधव हितचिंतक, मित्रपरिवार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.उन्मेश राठोड यांचे वतीने करण्यात आलेले आहे.