माननीय नामदार भुमिपुत्र अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते कपिलेश्वर पादाचारी पूल व स्वामी आणि हंसानंद घाट या विकास कामांचे लोकार्पण.
अमळनेर रयतसंदेश न्युज:-
तालुक्यातील सुप्रसिद्ध निम येथील श्री श्रेत्र कपिलेश्वर मंदिर संस्थान येथे उपस्थित राहून नूतन भक्तनिवास कपिलेश्वर पादचारी पुल व स्वामी हंसानंद घाट हे विकास कामाचे लोकार्पण केले या संस्थांच्या नव्या भक्तनिवासाचे उद्घाटन माननीय आमदार भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील (मंत्री मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील हे देखील उपस्थित होते पंचक्रोशीत तसेच संस्था परिसरात होत असणाऱ्या होऊ घातलेल्या सर्व विकास कामांचा आढावा घेत उपस्थित त्यांची संवाद साधला बहुसंख्येने भक्तगण,सौ.जयश्री ताई पाटील, प्रा.अशोक पवार, श्री.मगन गुरुजी, ग्रामस्थ उपस्थित होते आणि परिसरात या कामांमुळे आनंदाचे वातावरण आहे.