अमळनेरला विनायक हेगडे लिखित *डिअर तुकोबा* या पुस्तकाचे अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन .
अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
अमळनेर शहरात प्रथमच होणारा आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे मराठी रंगभूमी दिन याचे औचित्य साधून रसिक श्रोत्यांना एक अनोखी मेजवानी डियर तुकोबा नामक विनायक हेगडे लिखित पुस्तकाचे अभिवाचन आणि तेही एका वेगळ्या स्वरूपात प्रेक्षकांना ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे यात वाचक स्वर भाऊसाहेब देशमुख. मेघा पाटील .सुनंदा पवार. योगिता साळुंखे. संदीप घोरपडे व सात संगत योगेश पाटील( बासरी वादक) यांची राहणार आहे. कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह 5 नोव्हेंबर 2023 रोजी रविवारी सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे सदर कार्यक्रमास अमळनेरकर सर्व रसिकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन आयोजक संदीप घोरपडे सर यांनी केले आहे.