अमळनेर ता.अमळनेर ( दि.२७ फेबृवारी,२०२४ )
येथील मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार समाज, अमळनेर तर्फे संत नरहरी महाराजांचा हरिऐक्य सायुज्य समाधी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.सतिष मुंडके होते.तर अतिथी म्हणून डॉ.दिलीपकुमार श्रीमावळे, श्री.अनिल विंचूरकर, श्री.अशोक मुंडके, श्रीमती हर्षा चित्ते उपस्थित होते.अध्यक्षांसह अतिथींनी संत नरहरी महाराजांचा प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले.यानंतर समाजातर्फे श्री.सतिष मुंडके यांची नरहरी सेनेच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानें, श्रीमती हर्षा चित्ते यांचा सेवानिवृत्ती निमित्त, कुणाल दहिवाळ यांची गोल्ड व्हॅलिवर असोसिएशन तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती व श्री.महेंद्र कुलथे व सौ.माधुरी कुलथे यांनी समाजाला साऊंड सिस्टीम भेट दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच शालेय उपयोगी वस्तू मान्यवरांच्या हस्ते भेट देऊन कौतुक करण्यात आले.समाजाचे अध्यक्ष श्री.दिपक पवार, सर यांनी प्रास्ताविक करताना नवीन कार्यकारिणी पदाधिकारी यांचा परिचय करून दिला.मागील वर्षीच्या गणेशोत्सव व महाराजांचा पुण्यतिथीचा जमा – खर्च उपस्थित समाजापुढे मांडला तसेच समाज सभागृहात दुरुस्ती कामी रोख किंवा वस्तू स्वरूपात मदतीने आवाहन केले त्यास उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आपल्या अध्यक्षिय भाषणा श्री.सतिष मुंडके यांनी समाज संघटन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.आरती झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास डॉ.राजेंद्र नितुकडे, श्री.गोविंद चित्ते, श्री.हेमंत पवार, श्री.बाळू पांडव, श्री.शिवाजी कुळथे, योगेश पांडव, श्री.अविनाश पांडव, श्री.गिरीष सराफ, कुलदीप मुंडके, प्रविण मुंडके, श्री.विलास कुळथे, श्री. मनोहर दहिवाळ, श्री.निलेश नागोरी, श्री.योगेश खोरे, श्री.तुषार कुळथे, श्री राहुल नितुकडे, श्री.हेमांशु कुळथे, श्री.धिरज विंचूर, श्री.मनोज श्रीमावळे, श्री.कुणाल विंचूर,लाड सुवर्णकार समाज महिला मंडळ अध्यक्षा सौ.योगिता डहाळे, श्री.प्रभाकर पवार, श्री.शिरीष डहाळे,सर, श्री. पंकज पवार, श्री.अनिल पवार, श्री.सुरेश दहिवाळ, श्री.सुहास सराफ, श्रीमती अनिता नितुकडे, श्रीमती ममता पोतदार, श्री.वैभव सोनार, श्री.आधार खोरे, श्री.शांताराम खोरे, श्री.नागेश खोरे,. श्री.रमणलाल नागोरी, श्री.पद्माकर मुंडके, श्री.गणेश मुंडके, श्री.राजेश मुंडके, श्री.मेहुल विंचूरकर,श्री.नितीन विंचूरकर, श्री.नानासाहेब विंचूरकर, श्री.राजेंद्र कुळथे, श्री.अनिल कुळथे, श्री.संजय कुळथे, श्री.विलास कुळथे, श्री अमर कुळथे सह समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.सुंत्र संचलन व आभार श्री.दिपक पवार ,सर यांनी मानले.