मी निघालोय विधानसभेच्या उमेदवारीच्या दिशेने- संदिप घोरपडे

अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

मी संदीप घोरपडे मागील 32 वर्षापासून चा काँग्रेस कार्यकर्ता या नात्याने आपणास सांगू इच्छितो की मागील 32 वर्षात माझ्यावर कितीही अन्याय झाला मला वाळीत टाकण्यात आले तरीही माझ्या तोंडून निश्वास सुद्धा सुटला नाही
माझ्या विद्यार्थी दशेपासून युवक काँग्रेसमध्ये तत्कालीन अध्यक्ष संजय दादलीका यांनी विद्यार्थी संघटनेची जबाबदारी टाकली आणि मी बालवक्ता म्हणून तत्कालीन उमेदवार विजय नवल पाटील यांचा प्रचार करावा असा आग्रह चाळीसगावचे नगराध्यक्ष अनिल दादा देशमुख काँग्रेसचे नेते अरुण भाई गुजराती आणि चाळीसगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर दादा सोनवणे यांनी मला 1989 च्या लोकसभा निवडणुकीत विजय नवल पाटील यांच्या प्रचारार्थ सभांचा धडाका लावला त्यांना माहीत होते माझे आजोबा माजी आमदार साठी गुलाबराव पाटील हे जनता दलाचे पण त्यांनी भारतात लोकशाही आहे विचार स्वातंत्र्य आहे असे सांगत मला कधीही काँग्रेस सोडण्याचा सल्ला दिला नाही याउलट आजोबा या नात्याने मी गुलाब बाबांच्या निवडणुकांच्या साऱ्या जबाबदाऱ्या हिरीरीने पार पाडत असे पण कधीही मला जनता दलाचे सदस्य करून घेतले नाही माझ्या वक्तव्यावर खुश होऊन तत्कालीन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष युवक मधुसूदन सत्पाळकर यांनी मला जनता दलाचे अध्यक्ष करावे असे सुचवले मात्र बापूंनी त्यालाही नकार दिला व सांगितले तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे माझ्या राजकीय कारकीर्दीला 2000 साली नगरपालिकेपासून सुरुवात झाली पण तत्पूर्वीच मी माझ्या आजोबांनाच विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात त्यांचे मित्र महेंद्रसिंग बापू व ओंकार आप्पा वाघ यांच्या समवेत काँग्रेसमध्ये येण्यासाठी मन वळविले व त्यात मी माझ्या इतर सहकाऱ्यांसोबत यशस्वीही झालो
माझे राजकीय कारकीर्दीतील अपयशाला चंदेरी किनार अशी होती की साथी गुलाब बापूंचे शत्रू मला आपसुक शत्रू मानीत व गुलाब बापूंचे समर्थक मला त्यांचे स्पर्धक मानित यामुळे अनेकदा माझा पराभव हा दोन आकडी अंकानेच झाला मात्र मी कधीही निराश झालो नाही हतबल झालो नाही गांधी विचार साने गुरुजींचे ममत्व व गुलाब बापूंचे धाडस घेऊन माझा प्रवास मी तत्त्वादीष्टित काँग्रेस कार्यकर्ता म्हणून सुरूच ठेवला आहे काँग्रेसच्या परंपरागत गटबाजीला मी कधीही सामील झालो नाही मात्र दोन गटांना एकत्र आणण्यात माझा हातखंडा आहे व मी त्यात कायम यशस्वीपणे वाटचालही सुरू ठेवली आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची जबाबदारी माझ्याकडे दिल्यानंतर संपूर्ण काँग्रेस एक संघपणे उभी करून संपूर्ण पॅनल उभे करण्याचे धाडस मी दाखवले होते मात्र उमेदवारांना इतर मत पदरात पाडून घेण्याकरिता युती व्हावी अशी मनीषा होती आणि त्यात काँग्रेसचा पराभव झाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार मला सतत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन पक्ष संघटन बळकटीसाठी माझा वापर करतात आणि त्या अंतर्गत मी एरंडोल येथे बीएलए नोंदणीसाठी बैठकीला हजर होतो त्यामुळे मी अनुपस्थित होतो मात्र
यावेळी मी विधानसभेचा उमेदवार आहे संपूर्ण देशभर पैशावर राजकारण सुरू असताना मी मात्र गावागावात जाऊन लोकांना आवाहन करीत आहे की पैशाच्या वापराने राजकारण बिघडले बिघडलेल्या राजकारण्याने लोकशाही धोक्यात आली लोकशाही धोक्यात आल्याकारणाने विविध स्वायत्त संस्था या सत्ताधाऱ्यांच्या मांडलिक झाल्या यातून एकसंघ भारत हा खिळखिळा होऊ पाहतो आहे आणि याकरिता माझे अभियान आहे की पैशाशिवाय प्रामाणिक माणसे राजकारणात सुज्ञ मतदारांनी आणायला हवेत आणि याची सुरुवात मी इतरांना आवाहन करीत असताना अनेकांनी लक्षात आणून दिले की ही सुरुवात आपल्यापासूनच करा आणि म्हणून मी अमळनेर तालुक्यात विधानसभेचा उमेदवार म्हणून लोकांना आवाहन करताना सांगतो की बाहेरून कोणीतरी येईल व गाव विकत घेईल विविध समाज विकत घेईल किंवा मतदारांचे मतदान विकत घेईल या ऐवजी आपण
पाच वर्षाकरिता फक्त दहा रुपयात संदीप घोरपडे आमदार या नात्याने विकत घ्या
आपण माझ्याशी प्रामाणिक राहाल मी मतदार संघाशी प्रामाणिक राहील व ही बिघडलेली यंत्रणा दुरुस्त करण्या कामी अनेक चांगल्या विद्वान तज्ञ व्यक्तींच्या सहाय्याने संविधान टिकवण्यासाठी लोकशाही वाचविण्यासाठी महिलांच्या सन्मानासाठी तरुणांच्या उदरनिर्वाहासाठी रोजगार व वृद्ध लोकांना सन्मानाचे निवृत्त जीवन जगण्यासाठी मी निघालोय विधानसभेच्या उमेदवारीच्या दिशेने आणि मग पैशाच्या जोरावर गटबाजी करून पक्षाला बदनाम करणाऱ्यांना जाब विचारणे ऐवजी लोक ज्यांना टाळल्या जाते किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जाते अथवा त्यांच्या उपस्थितीने आमचे महत्त्व कमी होते की काय या भयाने हे लोक गटबाजी करून पक्ष दुबळा बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत याकरिता प्रिंट मीडियाने खरोखरच आघाडी टिकण्यासाठी आघाडी जोडो अथवा काँग्रेस मधील मतभेद मिटून काँग्रेस जोडो असा जो सल्ला दिला आहे तो कधीही आम्हाला शिरोधार्य आहे आणि आम्ही भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी एक दिलाने काम करण्यासाठी महाविकास आघाडीचा धर्म पालन करण्याचा शब्द देतो
आपल्यातलाच एक
संदीप घोरपडे
9422279710/8275054310
ghorpadesandipb@gmail.com

You cannot copy content of this page