अमळनेर रयतसंदेश न्युज:-
धी.शेंदुर्णी एज्यु.को-ऑप लि. सोसायटी संचलित,
आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी,
येथील विज्ञान विभागाला व व्यवसाय शिक्षण विभागाला एच.एस.सी परीक्षेत घवघवीत यश मिळाले असून कनिष्ठ महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली म्हणून यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व पालकांचे अभिनंदन होत आहे.
विज्ञान विभागाचा निकाल 100% लागलेला असून व्यवसाय शिक्षण विभागाचा निकाल 94.87% लागलेला आहे.
विज्ञान विभागात प्रथम विद्यार्थिनी ऐश्वर्या गरुड 88.17%, द्वितीय विद्यार्थिनी आर्या बाविस्कर 80.5%, तृतीय विद्यार्थिनी पल्लवी बारी 79.33, तर चौथ्या क्रमांकावर दिपाली पाटील 78.50%, दीक्षा गुजर हि विद्यार्थिनी पाचव्या क्रमांकाने यशस्वी झाली असून तीला 78.33% गुण मिळालेले आहेत.
तसेच व्यवसाय शिक्षण विभागातील विद्यार्थी प्रथम राहुल बारी 60%, द्वितीय खाटीक राजीद खालीद, 58.83%, तृतीय शितल पाटील, 57%,
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व प्राध्यापक वर्गांचे देखील संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड,उपाध्यक्ष आबासाहेब भीमराव शेळके,सचिव काकासो.सागरमलजी जैन, सहसचिव दादासो यु.यु.पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो.दीपकजी गरुड, दादासो. प्रवीण गरुड,नवतरुण आदर्श गणेश एकता मित्र मंडळ तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस. चौधरी,उपप्राचार्य व्ही.डी.पाटील पर्यवेक्षक जे.एस.जुबंळे, विनोद पाटील,प्राध्यापक शैलेंद्र शेळके या सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे दूरध्वनीद्वारे कौतुक करून पालकांचे अभिनंदन केले व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक वर्ग व्ही डी पाटील, एस आर पाटील, एस व्ही जावळे, एस एस सुर्वे, एस.ए.पवार, पी एस शिवपुजे, व्ही ए पाटील, पी.सी. सूर्यवंशी, एस एम कपले, बी.पी.पाटील, हर्षल बारी, आकाश चौधरी, प्रा. एस बी शेळके, बी एम महाले, एन.जी. वैष्णव इत्यादी गुरुजनांचे मार्गदर्शन लाभलेले आहे तर या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, पालकांचे व समुपदेशन,मार्गदर्शन व अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राध्यापक गुरुजनांचे देखील सर्वत्र अभिनंदन होत आहे.