जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस दादासो.संदीप घोरपडे यांच्या जनसंपर्क कार्यालय चे उद्घाटन, विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन.

अमळनेर रयतसंदेश न्युज :-

अमळनेर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी महाराष्ट्रभरातील जिल्हाध्यक्षांना आपल्या जिल्ह्यातील विविध समस्या नागरी प्रश्न तसेच सामान्य मतदारांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी संपर्क यात्रांचा धडाका लावला आहे
त्या अंतर्गत जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी अमळनेर विधानसभा क्षेत्रातील मोठी जबाबदारी जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांना यापूर्वीचे काम पाहून दिली आहे. जसे दिल्ली सीमेवर संसदेत पारित झालेल्या तीन कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी दिल्लीवर चालून येत असताना दिल्लीच्या चहू बाजूने सीमा बंदिस्त करण्यात आल्या आणि ते आंदोलन जवळ जवळ सव्वा वर्ष चालले. त्यात शेकडो शेतकऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्या कालावधीत संदीप घोरपडे यांच्यासह तत्कालीन अध्यक्ष गोकुळ बोरसे, मनोजबापू पाटील, शांताराम पाटील, सुलोचनाताई वाघ, सुरेश पिरन पाटील, रोहिदास पाटील, रामकृष्ण पाटील, भागवत गुरुजी, भागवत सूर्यवंशी, प्रताप नागराज पाटील, विवेक पाटील, संभाजी लोटन पाटील, अँड.गिरीश पाटील या सह शेकडो कार्यकर्त्यांनी अमळनेर तालुक्यातील गावागावात जाऊन शेतकरी पंचायती घेतल्या. तेथे मोदी सरकारने शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरणाऱ्या कायद्यांची निर्मिती केली ज्यायोगे शेतकऱ्यांचे जीवन मुश्किल होईल तसेच शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठीक केलेल्या अत्याचाराच्या घटना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. ज्यायोगे जनमत तयार झाले त्यामुळे केंद्र सरकारला हुकुमशाही पद्धतीने लागू केलेल्या कृषी कायद्यांना रद्द करावे लागले. त्यानंतर स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली तेव्हा संदीप घोरपडे यांनी 75 वर्षानंतर लोकशाही भक्कम होण्याऐवजी दुबळी झाली त्या कारणांचा शोध घेतला अमळनेर येथे काँग्रेस कमिटीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या उपस्थितीत सांगितले की आज राजकारणात होणारा पैशाचा गैरवापर हा लोकशाहीचा शत्रू आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून येणारं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व आम जनतेचा विचार न करणार तसंच आपल्या अनेकविध व्यवसायामध्ये पूर्णपणे त्यांना जनतेच्या प्रश्नांशी निगडित बाबी लक्षात येत नाहीत. आपण कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता येथून जनमत तयार करूया. की पैसा विना राजकारण करणारा काँग्रेस कार्यकर्ता हा निवडणूक लढण्यासाठी तयार व्हायला हवा. आणि तशी मनीषा व्यक्त करताच जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही लोकांपर्यंत जा आणि त्यांच्या भावना जाणून घ्या.

75 गावांचा प्रवास करत असताना जनमत काँग्रेस सोबत आहे असे लक्षात आल्याने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या कालावधीत संदीप घोरपडे यांनी अशी भूमिका घेतली की काँग्रेसने स्वतंत्र पॅनल उभे करावे. त्याला जिल्हाध्यक्षांनी मान्यता देखील दिली. सोबतच काँग्रेस पक्षाच्या मुलाखती पॅनल निर्मितीसाठी प्रमुख या नात्याने जबाबदारी देखील दिली. परिणाम स्वरूपी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेस यांच्या आघाडीने हिसकावून घेतली. हाच धागा पकडून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या 138 व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून संदीप घोरपडे यांनी काँग्रेस पक्षाकडे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आम्ही अमळनेरातील काँग्रेस नेते कार्यकर्ते 138 गावांमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाचा इतिहास त्यांची ध्येयधोरणे समतेचा विचार आम्ही जनतेच्या लक्षात आणून देणार एकूणच भारत देशाची जडणघडण करत असताना अत्यंत शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्या माणसांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम काँग्रेसने सामाजिक. सांस्कृतिक. राजकीय. आर्थिक. वैज्ञानिक. बौद्धिक क्षेत्रात अत्यंत हिरीरीने केले. मात्र मधल्या काळात ग्लोबल नीतीचा वापर करून काँग्रेसने जणूकाही या देशात काहीच केले नाही अशी आवई उठवून लोकांची मने भरकटवून या देशात अस्थिरता निर्माण केली. त्याकरिता लोकांमध्ये जाऊन वास्तव मांडण्याची इच्छा संदीप घोरपडे यांनी व्यक्त केली आणि जळगाव जिल्हा काँग्रेसने संधी उपलब्ध करून दिली.
दिनांक 11 जून सेनानी साने गुरुजी जे शेतकरी नेते म्हणून देखील ओळखले जातात यांचा स्मृतिदिन आहे याच दिवशी संदीप घोरपडे हे अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या दिवशी या संवाद यात्रेत कशा पद्धतीने नेत्यांना कार्यकर्त्यांना जनतेला सामील करून घेता येईल याविषयी संदीप घोरपडे यांचे संपर्क कार्यालयात सकाळी नऊ वाजेला साधक बाधक चर्चेसाठी बैठक होईल. संपर्क कार्यालयात सकाळी नऊ वाजेपासून तो संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत आलेल्या सर्व नागरिकांशी. कार्यकर्त्यांशी चर्चा करून मते जाणून घेणार आहेत. या संवाद यात्रेला सर्वानुमते परवानगी घेऊन या यात्रेला सुरुवात होत आहे
या सोबतच संदीप घोरपडे यांच्या संपर्क कार्यालयात विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे या विविध सरकारी योजना ज्या अनेक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकत नाही त्याकरिता संदीप घोरपडे स्वाभिमानी मित्र मंडळ अमळनेर या संस्थेचे कार्यकर्ते मदत करणार आहेत

You cannot copy content of this page