लोकनायक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (तुकाराम भाऊराव साठे )यांच्या जयंतीनिमित्ताने वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
अमळनेर प्रतिनिधी:- बापूराव ठाकरे.
युवा कल्याण प्रतिष्ठान, अंमळनेर अंतर्गत राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान महापुरुष यांच्या जयंती उत्सवानिमित्त वर्षभर राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 1 ऑगस्ट या जयंतीदिनानिमित्त वक्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन यशवंत सभागृह, धनदाई महाविद्यालय ढेकूरोड, अमळनेर येथे आयोजित करण्यात आले याप्रसंगी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर हरचंद कढरे सर यांनी अण्णाभाऊंनी लिहिलेलं गीत गायन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विजय तुंटे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनावर सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली यानंतर समारोपीय भाषणात प्रा.डॉ. लीलाधर पाटील सर यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सूर्यवंशी (संपादक, दिव्य चक्र)केले.प्रमुख वक्ते यांचा परिचय प्रा.डॉ. राहूल निकम सर यांनी करून दिला. यावेळी नुकतीच विज्ञान मंडळावर निवड झालेले निरंजन पेंढांरे सर यांचा सत्कार करण्यात आला.सदर प्रशिक्षण वर्गास बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग, पालक आणि मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि युवा कल्याण प्रतिष्ठान ची सर्व टीम उपस्थित होती.*जग बदल घालूनी घाव,सांगुनी गेले मज भिमराव.*