*साहित्य रत्न ,अण्णाभाऊ साठे*
अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.
भारतीय परंपरेने अस्पृश्य घोषित केलेल्या मांग जातीत अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला त्यामुळे त्यांच्या आधीच्या शेकडो पिढ्यांना शिक्षणाची दारे पार बंदच होती अण्णाभाऊ कसे बसे दीड दिवस शाळेत जाऊ शकले आणि एवढ्यावरच शिक्षणाला प्रोग्राम मिळाला परंतु दिवसाची 24 तास अण्णाभाऊ त्या व्यवस्था रुपी शाळेत अनुभव घेत होते तिथे त्यांची प्रचंड कुचुंबना आणि घुसमट होत होती समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव यापासून अण्णाभाऊ शेकडो मैल दुरच होते तेव्हा त्यांच्यातील माणूस हा माणुसकीच्या प्रेमापोटी खडबडून जागा झाला त्यांनी प्रचंड ताकदीने या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात विद्रोहीचे बंड पुकारले अण्णाभाऊंच्या साहित्याने सामान्य माणसाला माणूस म्हणून उभे केले अण्णाभाऊंच्या मेंदूमध्ये नेहमींसाठी माणूस माणुसकी आणि माणसांसाठीचा न्याय ही विचारतहीच घर करून होती त्यामुळेच अण्णाभाऊ सारख्या माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या आणि निसर्गतः प्रतिमेचा महासागर असलेल्या जातिवंत लेखकाला गप्प बसून राहणे शक्य नव्हते त्यामुळे जळणाऱ्याला जळू द्यावे किंवा जळणाऱ्याला जाळू द्यावे हा दृष्ट विचारच अण्णाभाऊंच्या पचनी पडत नव्हता यासाठी अण्णाभाऊंनी पोवाडा कथा कादंबरी सामाजिक नाटके अशा विविध अंगी रचनांची निर्मिती केली यातूनच त्यांनी स्वतंत्र विचारांचा समतेचा एल्गार करणारा आणि या देशात बंधू भावाची रुजवण करणारा खंबीर माणूस उभा केला देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी निषेध मोर्चा काढला जे लोक अन्यायाच्या ओजाने पार भरले गेलेले आहेत दुःख दारिद्र्य दुरावस्था अवहेलना हे टाळणे व अपमान यासारख्या 18 विश्व दारिद्र्याने गेलेले आहेत अशा लोकांच्या जीवनात अचानक प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यामुळे कोणती आकस्मिक क्रांती होईल हा अण्णाभाऊ च्या समोरच मुलगा आणि प्रश्न होता आजच्या वर्तमान परिस्थितीचा विचार करून पाहता देशात 30 ते 35 टक्के जनता दारिद्र्यरेषेच्या खालचे जीवन जगत आहेत तेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळची सर्वसामान्य ची परिस्थिती काय असेल याचा आपण साकल्यपूर्वक विचार केला केलेला बरा तात्पर्य अण्णाभाऊंनी 16 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये हजारो लोकांचा निषेध मोर्चा काढला शोषित अपेक्षित पीडित अशा अशा सर्व हारा वर्गाच्या साक्षीने मुंबई सरकारच्या विरोधात रान पेटवले. ही आजादी झुटी है देश की जनता बुकी है या घोषणेने लाखो मुंबईकरांना व करोडो देशवासीयांना मिळालेल्या स्वातंत्र्याचे सिवालोकन करण्यास अण्णाभाऊंनी भाग पाडले–
विद्रोही जीवन जगले,अशा साहित्य रत्नास कोटी कोटी नमन🙏🏼🙏🏼
—————————– लेखन :- डि.ए.पाटील सर