महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडे उमेदवारी मागणीसाठी संदीप घोरपडेंसह अनेकांचे जिल्हा काँग्रेसकडे अर्ज दाखल

रयतसंदेश न्युज नेटवर्क :–

अमळनेर ( प्रतिनिधी)-  दिनांक 23 जुलै 2024 रोजी, महाराष्ट्राचे प्रभारी रामनाथ चेन्नीथला यांच्या सूचनेनुसार, जळगाव जिल्हा काँग्रेस भवन येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात नव मतदार नोंदणी, तसेच काँग्रेस पक्षाचे मागील सहा महिन्यातील आंदोलनांचा आढावा व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. त्याच प्रमाणे, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील अनुचित घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून बी एल ए यांच्या कार्यपद्धतीची दिशा ठरविण्यात आली. याचवेळी संपूर्ण जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांना आपली मते मांडण्यास व उमेदवारी मिळविण्यासाठीचे अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले. त्या प्रसंगी, जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व अमळनेर विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक संदीप घोरपडे यांनी आपला अर्ज जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी, माजी जिल्हाध्यक्ष Adv संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, प्रदेश काँग्रेसचे बंटी भैया व इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे उपस्थित होते.अमजद पठाण, सुभाष देशमुख जाधव, रमेश पुंजु शिंपी, अशफ़ाक अहमद पटेल, मुफ्ती हारुन नदवि, संजीव बळीराम पाटील, डॉ. राठोड, के डी पाटील, हरीश पारुमल गवनानी, धनंजय हरीश चौधरी, डॉ. व्ही डी पाटील, फयाज हुसैन, रविंद्र आर निकम, अब्दुल हमीद शेख, भागवत केशव सुर्यवंशी, गजेंद्र दत्तात्रय साळुंखे, गोकुळ नामदेव बोरसे, Adv प्रविण नाना सुरवाडे, शेख सलीम हमिद, सखाराम मोरे, नितीन नेताजी सुर्यवंशी, दिनेश सोपानराव पाटील, Adv अमजद पठाण, गजानन देशमुख, अमोल देशमुख, हामिद मूसा कुरेशी, प्रा. मनोज देशमुख, मनोज चौधरी, अशफाक काझी, उद्ध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page